केज तालुक्यात विहिरीत बुडून २५ वर्षीय महिलेचा मृत्यू
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील डोका येथील एका २५ वर्षीय महिलेचा डोका येथील विहिरीत बुडून मृत्यू झाला असून हा अपघात कसा झाला याची चर्चा परिसरात सुरू आहे.
केज तालुक्यातील डोका (हादगाव) येथील सुशेन भांगे यांचे लग्न झालेले असताना त्यांचे ऊस तोड करणाऱ्या एका वाशीम जिल्ह्यातील वर्षा नावाच्या २५ वर्षीय महिले सोबत प्रेम जुळले. त्यामुळे मागील सहा महिन्या पासून सुशेन भांगे हा त्याची पहिली पत्नी व वर्षा हिच्या सोबत पती -पत्नी सारखे एकत्र राहत होते.
दरम्यान दि. ४ मे रोजी दुपारी
वर्षा सुशेन भांगे वय २५ हिचा नदीच्या कडेला असलेल्या विश्वनाथ भांगे यांच्या विहिरीत बुडून असताना एका महिलेने पाहिले. त्या महिलेने स्वतः च्या जिवाची पर्वा न करता वर्षा हिला पाण्या बाहेर काढले. उपचारासाठी तिला दवाखान्यात घेऊन जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. तिला उपजिल्हा रुग्णालय केज येथे आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ती मयत झाल्याचे घोषित केले.
सदरचा प्रकार हा घात की अपघात असावा? याची चर्चा सुरू असून मयत महिला ही अनुसूचित जातीची असल्याची माहिती समजते आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, बिट जमादार राजू गुंजाळ आणि चंद्रकांत काळकुटे यांनी घटना स्थळी धाव घेतली. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
