साळेगांव येथून एका रात्रीत सात विद्युत पंपांची चोरी : शेतकरी धास्तावले
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील साळेगाव येथील एकाच रात्री सात विद्युत मोटारी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, दि. ४ मे ते ५ मे च्या दरम्यान मध्यरात्री केज तालुक्यातील साळेगाव येथील माळेगावलवण नावाने ओळखले जात असलेल्या भागातील रुपेश घाटूळे, मच्छिंद्र घाटूळे, मल्हा गित्ते, नारायण बचुटे, अर्जुन वैरागे या शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणीबुडी विद्युत पंप अज्ञात चोरट्यानी चोरून नेले आहेत.
यामुळे या परिसरातील शेतकरी धास्तावले असून शेतकऱ्यांचे पिके पाण्याअभावी धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच या चोरीचा पोलीस यंत्रणेने तपास करण्याची मागणी होत आहे.
