बुद्ध सृष्टी येथे बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :- केज आणि कळंब येथील सीमेवर असलेल्या बुद्ध सृष्टीत महाकारूनिक भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली.
जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार दयानंद गायकवाड, कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत येरमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंद वाठोरे यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजा रोहन करण्यात आले.
या वेळी प्रा. डॉ. कांबळे, त्रिवेणिताई कसबे, महादेव गायकवाड, रामलिंग साळवे, पोल्सती मस्के सर, चंद्रकांत खरात, रमेश जगताप, पाटील मॅडम, राजू बचुटे, बबलू साखरे, पत्रकार गौतम बचुटे, डॉ. पाटील, आंभोरे, सावंत, काळे, गायकवाड यांच्यासह केज आणि कळंब परिसरातील बौद्ध उपासक उपस्थित होते.