• Fri. Apr 24th, 2026

नांदूरघाट येथे विक्रीसाठी आणलेल्या तलवारी जप्त

Bybaba maske

May 3, 2023

नांदूरघाट येथे विक्रीसाठी आणलेल्या तलवारी जप्त

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाची कारवाई

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील नांदूरघाट येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज यांच्या पथकाने नांदूरघाट येथे विक्रीसाठी आणलेल्या तलवारी जप्त करून मोठी कारवाई केली आहे. 

या बाबतची माहिती अशी की, दि. २ मे रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील पोलीस जमादार बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, अनिल मंदे आणि विकास चोपणे हे अवैध धंद्यावर छापा घालण्यासाठी नांदुरघाट येथे गेले होते. तेथे गुप्त बातमीदार मार्फत पोलीस पथकाला अशी माहिती मिळाली की, नांदूरघाट येथील अजय त्रिमुखे व ओम गोंद्रे हे दोघे विनापरवाना बेकायदेशीररित्या शास्त्राची चोरटी विक्री करीत आहेत. त्या पैकी एकजण मच्छी बाजार येथे येणार आहे. ही माहिती मिळताच पोलीस पथकाने सदर माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत कळविली. पंकज कुमावत यांच्या आदेशाने मच्छी बाजारातून अजय त्रिमुखे यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या ताब्यातून दोन तलवारी ज्याची किमत ६ हजार ५०० रु. आहेत त्या जप्त केल्या. 

पोलीस जमादार बालाजी दराडे यांच्या तक्रारी वरून अजय तुकाराम त्रिमुखे व ओम गोंद्रे दोघे राहणार नांदुरघाट यांचे विरुद्ध केज पोलीस ठाण्यात शस्त्र प्रतिबंधक कायदा कलम ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!