• Wed. Jun 3rd, 2026

दलित मयत अल्पवयीन मुलीच्या पार्थिवावर झाले केज येथील सार्वजनिक स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंतिमसंस्कार  

Bybaba maske

May 6, 2023

दलित मयत अल्पवयीन मुलीच्या पार्थिवावर झाले केज येथील सार्वजनिक स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंतिमसंस्कार

रोखठोक न्युज वार्ताहर 

 

दलित अल्पवयीन मुलीने केज तालुक्यातील डोका गावातील शिवारामधील विहिरीमध्ये नराधमाच्या जाचास कंटाळुन उडी मारुण आत्महात्या केली. आपली जीवनयात्रा संपवली . याची माहिती यवतमाळ येथील तिच्या कुटुबीयांना मिळताच बीड जिल्ह्यातील केज येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेऊन ” जो पर्यंत आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही व आरोपीला अटक होत नाही तो पर्यंत शवविच्छेदन करणार नाहीत असा पवित्रा घेतला ” .

कांही काळासाठी वातवरण तणावाचे झाले. यातच लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले यामुळे केज पोलीसांनी आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करूण व त्याला ताब्यात घेतल्यामुळे मयताच्या कुटुंबीयानी शवविच्छेदन करण्यास परवानगी दिली .

त्यामुळे दि. ६ मे रोजी दुपारी सायं ५.३० ते ६ च्या दरम्यान तिसऱ्या दिवशी क्रांतीनगर सार्वजनिक स्मशानभूमी केज येथे कुटुंबीयानंसह केज येथील समाज बांधवाच्या तसेच लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थिती मध्ये अगदी शोकाकूल वातावरणात दलित मयत अल्पवयीन मुलीच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!