• Wed. Apr 29th, 2026

दलीत अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या ; नराधमा विरुद्ध बलात्कार पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल तिसर्‍या दिवशी झाले शवविच्छेदन,तीन दिवस प्रेत केज उपजिल्हा रुग्णालयात.  लहुजी शक्ती सेनेच्या प्रियंका लांडगे व इतर कार्यकर्त्यांनी पिडीत कुटुबांला दिला धिर केला  केज पोलीसांनी आरोपीस  ठोकल्या बेड्या.

Bybaba maske

May 6, 2023

दलीत अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या ; नराधमा विरुद्ध बलात्कार पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल

तिसर्‍या दिवशी झाले शवविच्छेदन,तीन दिवस प्रेत केज उपजिल्हा रुग्णालयात.

लहुजी शक्ती सेनेच्या प्रियंका लांडगे व इतर कार्यकर्त्यांनी पिडीत कुटुबांला दिला धिर केला 

केज पोलीसांनी आरोपीस  ठोकल्या बेड्या.

रोखठोक न्युज वार्ताहर 

या बाबत सविस्तर माहिती अशी कि यवतमाळ जिल्ह्यातील एक दलित कुटुंबातील पती- पत्नी आपल्या दोन मुलीनां सोबत घेऊन उदरनिर्वाहासाठी ऊस तोडणीचे काम कर्नाटक राज्यात करत होते . ते ज्या टोळीत, ट्रकवर काम करत होते त्याचा मालक केज तालुक्यातील डोका या गावातील सुशील भांगे हा होता .एकुण १७ जन उसतोडणीसाठी कितुर जि. बेळगाव राज्य कर्नाटक येथे सुशील भांगे याच्या ट्रकमधुन गेले त्यानंतर तेथील काम संपल्यानंतर दुसऱ्या यादवाड कारखाण्याला जाण्यासाठी वेळ असल्यामुळे सुशील भांगेने आपल्या शेतातील सोयाबीन काढण्यासाठी त्या दलित कुटुंबाना घेऊन आपल्या डोका या गावी आनले तेथे १० ते १५ दिवस सोयाबीन काढणीचे काम झाल्यानंतर ते परत आपल्या गावी गेले. त्यानंतर डिसेंबर २०२२ रोजी फिर्यादीच्या जावयासोबत दोन अल्पवयीन मुली पत्नी यांना घेऊन परत कितुर येथे उसतोडणी साठी गेले असता त्यानंतर एकच मुलगी जावई व तिच्या आई सोबत दिसली परंतू एक मुलगी दिसली नाही त्यानंतर कांही वेळाने सुशील भांगे याचा फोन मुलीच्या वडीलांना आला आणी त्याने सांगीतले कि तुमची मुलगी माझ्याजवळ आहे. पती- पत्नी तात्काळ स्थानीक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेले परंतु ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी गुन्हा दाखल करा असे त्यांना सांगीतले.

कांही दिवसानंतर त्याच अल्पवयीन मुलीचा फोन वडिलांना आला तिने सुशील भांगे मला मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ करुण वारंवार जबरदस्ती आत्याचार करत आहे असे सांगीतले. त्यानंतर मुलीचे आईवडील डोका येथे जाऊन आपल्या मुलीला घेऊन आपल्या दुसऱ्या मुलीच्या घरी सोडुन आपल्या गावी गेले असता पाच दिवसानंतर सुशील भांगे तेथे जाऊन मुलीला परत डोका गावी घेऊन आला. परत त्या अल्पवयीन मुलीला त्रास देऊ लागला त्यानतंर या विवेचनेतून सुटण्यासाठी दि ४ मे मंगळवार दुपारी अल्पवयीन मुलीने डोका शिवारातील विहिरीमध्ये उडी घेतली.

विहिरीत बुडत असताना एका महिलेने पाहून तिने स्वतः च्या जिवाची पर्वा न करता त्या अल्पवयीन मुलीला विहिरीतील पाण्याबाहेर काढून तिला उपचारासाठी केज येथील रुग्णालयात घेऊन जात असतानाच वाटेत तिचा मृत्यू झाला. म्हणुन मयत अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सुशील भांगे रा डोका ता .केज याच्या विरुद्ध गु.र.न.२५३ कलम ३०६,३७६, (२)(एन),३२३,५०४,४,६ प्रमाणे केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्या बरोबर आरोपीस केज पोलिसांनी बेड्या ठोकल्या असुन घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे करीत आहेत.

मयत अल्पवयीन मुलगी ही दलित समाजाची असल्याने या गुन्ह्यात ॲट्राॅसीटीचे कलम वाढले जाण्याची शक्यता आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!