• Fri. Jun 5th, 2026

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची माजलगाव मध्ये मटका अड्ड्यावर धाड १ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेत ३२ जुगाऱ्यासह मटका बुक्की मालकावर कारवाई

Bybaba maske

May 5, 2023

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची माजलगाव मध्ये मटका अड्ड्यावर धाड

१ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेत ३२ जुगाऱ्यासह मटका बुक्की मालकावर कारवाई

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- माजलगाव येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने मटका बुक्क्यावर धाडसी कारवाई करून २७ जुगारी यांना ताब्यात घेत ५ मटका बुक्की मालक यांच्यावर कारवाई करीत त्यांच्याकडून १ लाख ८७ हजार रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. ५ मे रोजी माजलगाव उपविभागाचे अतिरिक्त प्रभारी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना माहिती मिळाली की, माजलगाव शहरात छुप्या पद्धतीने मटका सुरू आहे.

माहिती मिळताच पंकज कुमावत यांनी माजलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस अंमलदार अनिल भालेराव, पोलीस नाईक अशोक नामदास, पोलीस अंमलदार युवराज चव्हाण, पोलीस अंमलदार गणेश नवले, पोलीस अंमलदार तुकाराम कानतोडे, पोलीस अंमलदार संतराम थापडे यांना कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच पोलीस पथकाने दि. ४ मे रोजी माजलगाव येथील बस स्टॅंड आणि जुना मोंढा नाका येथे छापा टाकला. या छाप्यात त्यांना जुगार खेळणारे २७ जणांना ताब्यात घेत त्यांच्या कडून १ लाख ८७ हजार ३०० रु चा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस हवालदार अनिल राठोड व पोलीस नाईक अशोक नामदास यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन शेख सिकंदर शेख आयुब (रा. फुलेनगर, माजलगाव), गणेश नरहरी देशमाने, (रा. मानवत जि. परभणी) शेख शब्बीर शेख चाँद,(रा. आझाद नगर माजलगाव), प्रकाश दत्तात्रय सावंत, (रा. पाटील गल्ली माजलगाव), साळीग्राम संपतराव शेवाळे, (रा.जुजगर गल्ली माजलगाव), शेख इब्राहीम शेख हसन, (रा. आझादनगर माजलगाव), रितेश सुंदराव शिनगारे, (रा. भिमनगर माजलगाव), प्रकाश मोतीराम मेंढके, (रा. गौतमनगर माजलगाव), अरविंद भानुदास अलझेंडे, (रा. पात्रुड ता. माजगाव), मुन्ना इसाक शेख, (रा. आयशा नगर माजलगाव), संतोष सर्जेराव कदम, (रा. आझाद नगर माजलगाव), चंद्रशेखर रामभाऊ खोत, (रा. फुलेनगर माजलगाव), विशाल विष्णु अलझेंडे, भिमराव यादवराव डोंगरे, (रा. पंचशिल नगर माजलगाव), गोविंद सुखदेव गंधारे, (रा. खंडोबा मैदान माजलगाव), सुधीर भगवान गाते, (रा. शाहु नगर माजलगाव), कृष्णा नरहरी सुपेकर, (रा. जुनगर गल्ली माजलगाव), शेख मुख्तार सत्तार, (रा. आयशानगर माजलगाव), नागोराव पिराजी चव्हाण, (रा. वडारवाडा माजलगाव) गोरख सुखदेव पवार, (रा. वडार कॉलनी परळी), नितीन रामभाऊ जगताप, (रा. सावरगाव माजलगाव), प्रल्हाद अर्जुन कांडोरे, (रा. आळसेवाडी ता. माजलगाव), आसाराम सखाराम यादव, (रा. कालिका नगर माजलगाव), लक्ष्मण सोनाजी ढगे, (रा. मनुर ता. माजलगाव), प्रविण रामभाउ खळगे, (रा. भिमनगर माजलगाव), सारंग भगवान स्वामी, (रा. भिमनगर माजलगाव), गणेश अशोकराव कदम, (रा. जयहिंद नगर माजलगाव) यांना ताब्यात घेत आणि मटका बुक्की मालक शेख आसेफ शेख हारुण, शेख जहीर शेख खदीर, शेख इरशाद शेख इब्राहीम, शेख अतिक शेख वाहब व सत्तारखॉन समसेरखान ऊर्फ गुड्डु रा. माजलगाव याचे विरुध्द माजलगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ६५ (इ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!