• Sun. Apr 19th, 2026

केज मध्ये वारंवार जाते वीज,सुरू करणारे आहे का कोणी? प्रमुख अभियंत्यांचे पद रिक्त,उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रकार. उन्हाळ्यात नागरिक त्रस्त.  

Bybaba maske

May 14, 2023

केज मध्ये वारंवार जाते वीज,सुरू करणारे आहे का कोणी?

प्रमुख अभियंत्यांचे पद रिक्त,उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रकार.

उन्हाळ्यात नागरिक त्रस्त.

रोखठोक न्युज वार्ताहर 

शहरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांची हेळसांड होत असून वीजपुरवठा तत्पर सुरू करण्यासाठी कोणी आहे का? असा सवाल केला जात आहे. सहा महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढलेले असताना याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. भर उन्हाळ्यात नागरिकांची हेळसांड थांबवून सतत खंडित होत असलेला वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी काँग्रेसचे युवक नेत पशुपतीनाथ दांगट यांनी केली आहे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनाही नियमित वीज देण्याची मागणी त्यांनी केली.

  1. महावितरणच्या कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांसह इतर पदे रिक्त आहे. यामुळे आपत्कालीन सुविधेत मोडणारी  महावितरणची असलेलीही व्यवस्था ढासळत आहे.   पूर्णवेळ अधिकारी नसल्याने केज महावितरणचा बोजवारा उडालेला दिसत आहे. याचा परिणाम थेट वीज वितरण व्यवस्थेवर होत आहे. बाजारपेठ, गाव भागासह केज तालुक्यातील वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. उष्णता वाढत असल्याने खंडित होणाऱ्या वीजने पंखे, कूलर, एसी बंद असून आबालवृद्धांचे हाल होत आहेत अनियमित वीजने घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान होत आहे. याबाबत महावितरणकडे चौकशी करणाऱ्या वीज ग्राहकांना उडवाउडवीचे उत्तर कर्मचारी देत असल्याच्या तक्रारी आहेत. वीज सुरळीत मिळत नसताना ग्राहक व्यापाऱ्यांना महावितरणकडून दिली जाणारी अपमानास्पद वागणूक बंद करावी. वीज व्यवस्थापनासाठी पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करावेत. अखंडित वीज द्यावी, नसता आंदोलनाचा इशारा पशुपतीनाथ दांगट यांनी रोखठोक न्यु शी बोलताना केला.

चौकट 

पुर्ण वेळ अधिकारी नियुक्त करा 

वीज वितरण कंपनीचे केज चे कार्यकारी अभिंयता आंबेकर यांची बदली झाल्या पासून हे पद रिक्त आहे.

 अभियंता सुतार यांच्या कडे पदभार आहे.पुर्णवे॓ळ अधिकाऱ्यांची नियुक्त करावी अशी मागणी होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!