• Wed. Jun 3rd, 2026

शाहीर मधुकर कदम वादळवारा पुरस्काराने सन्मानित

Bybaba maske

May 14, 2023

शाहीर मधुकर कदम वादळवारा पुरस्काराने सन्मानित

रोखठोक न्युज वार्ताहर 

महाकवी भीमशाहिर वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त केज तालुक्यातील विद्रोही भिम शाहीर मधुकर कदम यांना मराठी साहीत्य वार्ता व महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समिती बीड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी साहीत्य सम्मेलन बीड येथे महाकवी वामनदादा कर्डक वादळवारा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केज तालुक्यातील पैठण (सावळेश्वर) यासारख्या छोट्या गावात राहून शाहिरीला सुरुवात केली. संगीताचे कोणतेही शिक्षण नसताना त्यांनी शाहिरी मध्ये नावलौकिक मिळविला. मधुकर कदम यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात कार्यक्रम सादर केलेले आहेत. या माध्यमातून त्यांनी अंधश्रद्धा आणि समाजातील अनिष्ट प्रथेवर प्रहार केला असून फुले, शाहू आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळ यावर ते शाहिरीच्या मद्यमातून प्रबोधनाचे कार्यक्रम करीत असतात.

या त्यांच्या शाहिरीच्या दखल घेऊन बीड येथे झालेल्या मराठी साहीत्य वार्ता व महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समिती बीड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी साहीत्य सम्मेलनात सम्मेलनाध्यक्ष तथा आखील भारतीय वाणीज्य परिषदेचे अध्यक्ष प्रा डॉ वाल्मिक सरवदे, आंबेडकरी साहीत्यीक व अभ्यासक मा. ज. वि. पवार, संयोजक अमरदिप वानखेडे, शेखर मगर यांच्या हस्ते महाकवी वामनदादा कर्डक वादळवारा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

 मधुकर कदम त्यांचे लोक चळवळीतील फुले शाहू आंबेडकरी विचारधारा, प्रबोधन, जाणीव जागृती योगदान अतुलनीय आहे. ग्रामीण भागातील प्रबोधनात्मक उत्कृष्ट कार्य या बद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या बद्दल मधुकर कदम यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!