मागासवर्गीय वसतिगृहात रेशन घोटाळा, समिती करणार चौकशी.
माजी पंचायत समिती सदस्याच्या तक्रारीची घेतली दखल
रोखठोक न्युज वार्ताहर
रेणुका माता कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत येणाऱ्या सात निवासी शाळा व मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये रेशन घोटाळा झाल्याचा आरोप केज पंचायत समितीचे माजी सदस्य पिंटू ठोंबरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार • दाखल करत केला होता. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. १५ दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे त्यांना आदेशित केले आहे.
राज्य शासनाकडून, जिल्हा परिषद
समाजकल्याण बीड विभागांतर्गत
येणाऱ्या निवासी शाळा, वसतिगृहांना
विविध योजनेतून रेशन पुरविले जाते.
याच योजनांचा लाभ केज तालुक्यातील देवगाव येथील रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान
अंतर्गत येणाऱ्या काही निवासी शाळा व वसतिगृहांनी घेतला आहे. देवगाव येथील ज्ञानोबा मुंडे मागासवर्गीय वसतिगृह, शिंदी येथील रेणुकामाता मागासवर्गीय वसतिगृह, विडा येथील राजा हनुमान वसतिगृह ही तिन्ही वसतिगृहे केवळ कागदोपत्री सुरू असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या वसतिगृहात बोगस विद्यार्थी संख्येच्या आधारे व बोगस जाती दर्शवून शासनाच्या विविध योजनेंतर्गत वर्षानुवर्षे कोट्यवधी रुपयांचा निधी हडप करण्यात
तसेच, रेणुकामाता प्रतिष्ठान अंतर्गत शासनाची मान्यता नसलेल्या वाघेबाभूळगाव येथील विश्वनाथ दराडे निवासी शाळा, विडा येथील रामकृष्ण महाराज निवासी शाळा, केळगाव, बेलगाव येथील गजेराम मुंडे निवासी शाळा, पिंपळगव्हाण येथील रामकृष्ण महाराज निवासी विद्यालय या चारही निवासी शाळांमध्ये बोगस विद्यार्थी संख्या दाखवून राशनसह इतर माल उचलण्यात आल्याचा करण्यात आला आहे. आरोप करण्यात आला आहे.
समितीत आहेत उपजिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार
▪️ रोहयो उपजिल्हाधिकारी डॉ. प्रियंका पाटील या समितीच्या अध्यक्षा तर जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार डॉ.मंजुषा लटपटे या सदस्य सचिव आहेत.
■ या दोन सदस्यीय समितीने १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मुधोळ यांनी ६ मे रोजी दिले आहेत.
मागासवर्गीय वसतिगृहात रेशन घोटाळा, समिती करणार चौकशी.माजी पंचायत समिती सदस्याच्या तक्रारीची घेतली दखल
