• Fri. Apr 24th, 2026

केज तालुक्यातील रोहित्री दुरूस्ती नाही केल्यास ताळेबंद आंदोलनाचा बजरंग सोनवणे यांचा इशारा !  

Bybaba maske

May 15, 2023

केज तालुक्यातील रोहित्री दुरूस्ती नाही केल्यास ताळेबंद आंदोलनाचा बजरंग सोनवणे यांचा इशारा !

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील विविध गावातील खराब झालेले रोहित्र गेली अनेक महिन्यांपासून दुरुस्ती केलेले नाहीत. यासंदर्भात बजरंग सोनवणे यांच्या वतीने आज केज उपअभियंता अधिकारी यांना शेतकर्यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. मंगळवार दि २३ मे २०२३ पर्यंत सदर रोहित्र दुरुस्ती करून नाही दिल्यास शेतक-या समवेत महावितरण उपविभाग कार्यालयास ताळे बंद करून आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत. तोपर्यंत प्रशासनाला सदबुद्धी येण्यासाठी पवित्र ग्रंथ “हरिपाठ” यावेळी उपस्थित अधिकार्यांना सप्रेम भेट म्हणून देण्यात आला.या विषयी सविस्तर असे की उपरोक्त विषयी कळविण्यात येते की, केज तालुक्यातील गावातील खराब झालेले रोहित्र गेली अनेक महिन्यापासुन दुरूस्ती केलेले नाहीत, ती अत्यंत गंभीर बाब असून देखील आपल्या कार्यालयाने त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसुन येत आहे. केज तालुक्यातील सदरील गावातील रोहित्र बार मंगळवार दि.23-5 / 2023 रोजीपर्यंत दुरुस्ती करून न दिल्यास शेतक-या समवेत आपले कार्यालय ताळे बंद करून आपला निषेध केला जाईल.मांगवडगाव सिंगल फेज,काशिदवाडी सिंगल फेज , सोनेसांगवी सिंगल फेज ,सिंगल फेज ,जानेगाव सिंगल फेज ,कुंबेफळ सिंगल फेज पाणीपुरवठा थ्री फेज ,विडा दहिफळवड सिंगल फेज, युसूफ वडगाव अंतर्गत शिंदेवाडी सिंगल फेज़ ,होळ

भोपला सिंगल , जवळवन सिंगल फेज ,बनकरंजा सिंगल फेज सिंगल फेज ,फेकतसारणी ,बनसारोळा सिंगल फेज , केकाणवाडी सिंगल फेज ,लाडेवडगाव सिंगल फेज , कळम अंबा सिंगल फेज ,ढाकेफळ पोल वसविणे , वरपगाव सिंगल फेज,वाघेबाभूळगाव अंतर्गत आगेवाडी सिंगल फेज ,शिरूरघाट सिंगल फेज , आनंदगाव सा. सिंगल फेज ,पैठण सा. सिंगल फेज , सावळेश्वर सिंगल फेज ,आवसगाव सिंगल फेज ,टाकळी सिंगल फेज , लाखा , शिरपुरा सिंगल फेज ,सारणी आ. सिंगल फेज , मोटेगाव सिंगल फेज ,सुर्डी सिंगल फेज ,नायगाव सिंगल फेज ,लाडेगाव सिंगल फेज , पळसखेडा , दिपेवडगाव सिंगल फेज सिंगल फेज ,कौडगाव सिंगल फेज ,कोरेगाव सिंगल फेज ,औरंगपुर सिंगल फेज ,आवसगाव सिंगल फेन तरी वरील गावातील खराब झालेले रोहित्र दुरूस्ती करून देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महावितरण कंपनीला बजरंग सोनवणे यांनी दीला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!