• Sun. Apr 19th, 2026

शारदा इंग्लिश स्कूल केज चा सी बी एस ई बोर्ड परीक्षेचा  100% निकाल शाळेमध्ये सर्वप्रथम आकुसकर शिवेंद्र सोमनाथ 97.40, द्वितीय मालपाणी पार्थ मनोज कुमार 96.40, तर तृतीय कु. शिनगारे  आदिती परमेश्वर 96.00.

Bybaba maske

May 13, 2023

शारदा इंग्लिश स्कूल केज चा सी बी एस ई बोर्ड परीक्षेचा  100% निकाल.

शाळेमध्ये सर्वप्रथम आकुसकर शिवेंद्र सोमनाथ 97.40, द्वितीय मालपाणी पार्थ मनोज कुमार 96.40, तर तृतीय कु. शिनगारे  आदिती परमेश्वर 96.00.

रोखठोक न्युज वार्ताहर 

सीबीएसई बोर्ड नवी दिल्लीच्या वतीने मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. शारदा इंग्लिश स्कूल केज ने यशाची परंपरा कायम ठेवली असून परीक्षेत बसलेल्या 135 विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी अत्यंत उल्लेखनीय गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असून शाळेच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा लागला आहे. तसेच निकालाची गौरवशाली परंपरा कायम ठेवण्यात शाळेला यश आले आहे.

 परीक्षेत बसलेल्या 135 विद्यार्थ्यांनी पैकी शाळेमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान आकुसकर शिवेंद्र सोमनाथ 97.40, द्वितीय मालपाणी पार्थ मनोज कुमार 96.40, तर तृतीय कु. शिनगारे  आदिती परमेश्वर 96.00 यांनी पटकावला आहे.

 तसेच खराडे प्राची आदिनाथ 95 .40 घोळवे धनंजय विजय 95.40 बोरगावकर प्राची 95.20 तोष्णीवाल प्रणव 93.40 या घुमरे राजनंदनी 93.20 लोखंडे प्रथमेश 92.80 टोम्पे अनिकेत 91.80 वडगावकर संयुक्ता 91.40 यांच्यासह इतरही विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे

शाळेतील एकूण परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 90 ते 100% मध्ये 22 विद्यार्थी असून 80 ते 90 टक्के च्या दरम्यान 45 विद्यार्थी आहेत उर्वरित बहुतांश विद्यार्थ्यांनीविद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट यश मिळवले असून या विद्यार्थ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

अलीकडे झालेल्या शाहू महाविद्यालय लातूर च्या स्क्रीनिंग टेस्ट मध्ये याच बॅचेचे शिवेंद्र आकुसकर,यश सावंत, कृष्णा मुळे, प्राची बोरगावकर, टोम्पे अनिकेत या पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या याच्याबद्दल संस्थेचे सचिव माननीय रमेशरावजी आडसकर साहेब, शारदा इंग्लिश स्कूलच्या मार्गदर्शिका तथा संस्थेच्या संचालिका प्रा अर्चनाताई आडसकर, शाळेचे प्राचार्य मिश्रा एस एम, उपप्राचार्य सुरज सनी व सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले आहे

यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेत सचिव मा रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या हस्ते दिनांक 14.5.2023 रोजी शारदा इंग्लिश स्कूल केज या ठिकाणी सकाळी ठीक 9. 30  वाजता होणार आहे या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शालेय प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!