केज अंबाजोगाई रोडवर अपघात एक ठार एक जखमी.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज- अंबाजोगाई रोड वर ढाकेफळ बस स्टॅंड पासून थोडे पुढे गेल्यावर अज्ञात चारचाकी वाहनाने मोटारसायकल स्वारास जोराची धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जखमी झाला आहे.केज वरून आपले काम करून सावळेश्वर पैठण या आपल्या गावी प्रशांत अनुरथ सरवदे व अमोल सरवदे हे शाहिन मोटारसायकल वरून गावाकडे जात असताना अंबाजोगाई कडून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली यात प्रशांत अनुरथ सरवदे हा जागीच ठार झाला व अमोल सरवदे हा जखमी झाला आहे.अज्ञात चारचाकी वाहनाने 250 मिटर मोटारसायकल अक्षरशा फरफटत घेऊन गेली.चारचाकी वाला डायव्हर गाडी घेऊन बीड रोड कडे पसार झाला आहे.मृत व जखमीला उपजिल्हा रुग्णालयात 108 ॲमब्यूलन्स ने दाखल केले आहे.कालच या रोड वर चारचाकीने बजाज एम ए टी वर जाणाऱ्या महादेव पांचाळ याना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.24 तासात ही दुसरी घटना घडल्याने वाहनाच्या वेगाच्या नियंत्रणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
