केज तालुक्यात एकाच दिवशी गांजी व नामेवाडी येथे दोन बालविवाह रोकले.
रोखठोक न्युज वार्ताहर
तालुक्यातील दोन गावात अल्पवयीन मुलींचे साखरपुड्याच्या कार्यक्रमात बालविवाह आयोजित करण्यात आले होते. ही माहिती समजताच चाईल्ड लाईनसह प्रशासनाने तत्परता दाखवून हे दोन्ही बालविवाह रोखले. तर दोन्ही कुटुंबाचे समुपदेशन करून त्यांना नोटिसा देण्यात दिल्या आहेत.
शेलगाव गांजी येथील विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात एका १६ वर्षे वयाच्या मुलीचा साखरपुड्याच्या कार्यक्रमात बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच केजचे तहसीलदार सचिन देशपांडे यांनी तात्काळ भ्रमणध्वनीवरून सदरचा बालविवाह रोखण्याचे आदेश दिले. त्यानंतर चाईल्ड लाईनचे संतोष रेपे, ग्रामसेवक ग्रामसेवक एस. जी. राऊत यांनी तलाठ्यांसह मंदिरात धाव घेतली. तर सदर मुलीचा विवाह गावातीलच गोवर्धन पटणे यांच्या मुलासोबत ठरल्याचे निदर्शनास येताच त्यांनी सरपंच श्रीहरी चंद्रशेन जाधव, सोमनाथ मलिकार्जून पटणे, गोविंद विनायक आकुसकर, महादेव छत्रभुज पटणे, लक्ष्मण बप्पाजी आकुसकर या पंचाच्या स्वाक्षरींने पंचनामा केला. या दोन्ही कुटुंबाचे समुपदेशन करून त्यांना नोटीस देण्यात आली.
दुसरा बालविवाह हा केज तालुक्यातील नामेवाडी येथील एका १५ वर्षे ७ महिने वयाच्या मुलीचा बालविवाह कोल्हेवाडी येथील भीमराव मिसाळ यांच्या सिद्धेश्वर नावाच्या २५ वर्षे वयाच्या मुलासोबत कोल्हेवाडी शिवारातील भीमराव गोपाळ मिसाळ यांच्या शेतातील घरी साखरपुड्याच्या कार्यक्रमात होणार होता. त्या ठिकाणी तलाठी ए. बी. मुळे, मंडळ अधिकारी एस. व्ही. डोरले, संरक्षण अधिकारी एल. एस. राऊत, चाईल्ड लाईनचे संतोष रेपे, पोलीस नाईक बाळू सोनवणे यांनी भेट देऊन पंचनामा केला. या कुटुंबाचे ही समुदेशन करीत नोटीस देण्यात आली.
दरम्यान, चाईल्ड लाईनसह प्रशासनाने माहिती मिळताच तत्परतेने दोन्ही ठिकाणी वेळीच पोहचून हे दोन्ही होणारे बालविवाह रोखले.
