नगरपंचायतच्या गलथान कारभाराने 400 दुकाने 1000 कुटुंब उध्वस्त!! 16/6/2023 हा नगरपंचायत च्या इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल. केज येथील टपरी धारकाकडुन हमारी जगा है, हमारे चाचा की है, हमारे मामा कि है, हमारे दादा कि है म्हणुन किराया वसुल करणारे हमारी जगा है म्हणून जागा वाचवण्यासाठी समोर येताना दिसले नाहीत
16/6/2023 हा नगरपंचायत च्या इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल.
केज येथील टपरी धारकाकडुन हमारी जगा है, हमारे चाचा की है, हमारे मामा कि है, हमारे दादा कि है म्हणुन किराया वसुल करणारे हमारी जगा है म्हणून जागा वाचवण्यासाठी समोर येताना दिसले नाहीत रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहरातील अतिक्रमण मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.या मधी गोरगरीब ज्याचे हातावर पोट आहे असे लोक किरायाच्या गाळ्यात आपला छोटा व्यवसाय करून पोट भरत होते.स्व.विलासराव देशमुख असताना फलोत्पादनची काही जागा व्यापारी संकुल साठी मंजूर केली होती पण ही जमीन आम्ही 99 वर्षाच्या भाडेतत्त्वावर फलोत्पादन ला जमीन दिली आहे व ती परत करावी या आशयाने न्यायालयात काही मंडळी गेली होती.पण यातील काही जागा व्यापारी संकुल साठी नगरपंचायत कडे हस्तांतरीत केलेल्या जागेच भांडण नगरपंचायत लढते का नाही हे कळायला मार्ग नाही.गेल्या 35 वर्षा पासून या टपरीधारकाचा प्रश्न रेंगाळत आहे.नवीन सत्तेत आलेले जनविकास परिवर्तन आघाडी हे अतिक्रमण थांबवू शकली असती कारण सर्व सत्ताधारी मंडळी ही भाजप व त्या विचाराची आहे.त्यांनी जर महाराष्ट्र शासनाला 400 व्यावसायिकाचे प्रश्न व त्यांचे असलेले हाता वरचे पोट हे शासन दरबारी निदर्शनास आणले असते तर व वरील व्यावसायिकाचा प्रश्न समजावून सांगीतला असता तर या अतिक्रमण मोहिमेला स्टे भेटला असता पण तसे न करता उलट नगरपंचायत ने अतिक्रमण उठावे म्हणून ठराव घेतल्याचे बोलले जात आहे. तात्पुरती पर्यायी व्यवस्था करून जर ही मोहीम राबविली असती तर आज यान विस्थापित होण्याची वेळ आली नसती.बस स्टॅंड च्या पाठ मागील रिकाम्या जागेत जर सगळ चिकन मटन मार्केट बसवले असते तर जे दुर्गंधी व कोंबडीच्या पंख याची समस्या होती ती मिटली असती.व अतिक्रमण बाबत जो चिकन मटण च्या दुर्गंधी मुळे रोष होता तो कमी झाला असता. या अश्या नगरपंचायतच्या कृतीने आज 400 कुटुंब उघड्यावर आले आहे.पण याचे सोयरसुतक कोणालाच दिसत नाही.आज, उद्या त्यांची चुल कशी पेटल हा माणूस म्हणून विचार केला तर मेंदूला झिणझिण्या आल्या शिवाय रहात नाही.केज शहराने मोकळा श्वास घेतला ही असेल पण 400 कुटुंबाचा श्वास किती गुदमरला असेल याचा विचार करायला या सत्ताधाऱ्यांनकडे वेळ असेल का? 16/6/2023 हा नगरपंचायत च्या इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल.