केज येथे कळंब चौकात टिप्पर व मोटार सायकलचा अपघात : दोघे बहीण भाऊ जखमी
अतिक्रमणे हलविली तरी वाहने रोडवरच उभी : वाहतूक शाखेने लक्ष देण्याची गरज
रोखठोक न्युज वार्ताहर
गौतम बचुटे/केज :- केज येथील शिवाजी महाराज चौकात मोटार सायकल व टिप्परचा अपघात झाला असून त्या अपघातात धारूर येथील दोघे बहीण भाऊ जखमी झाले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, सोमवार दि १९ जून रोजी सायंकाळी ५:३० वा च्या सुमारास केज येथील शिवाजी चौकात टिप्पर क्र. (एम एच ४४/९०६५) व मोटार सायकल क्र. एम एच ४४/वाय-५९९३) यांचा अपघात झाला. या अपघातात दीपक भारत शेळके वय (२८ वर्ष) व त्यांची बहीण लता भारत शेळके वय (२५ वर्ष) दोघे रा. धारूर जि. बीड हे दोघे जखमी झाले आहेत. असून दोघांच्याही पायाला दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती कळताच पोलिसानी अपघातस्थळी हजर धाव घेतली.
अतिक्रमण हटविले तरी वाहने रस्त्यावर उभी :-दरम्यान मागील दोन दिवसा पूर्वी केज शहरातील व रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली असली तरी अनेक दुचाकी व इतर वाहने रस्तावर उभी आहेत. त्यामुळे रहदारीची कोंडी होत आहे. वाहतूक शाखेने कारवाई दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.