• Mon. Apr 20th, 2026

नगरपंचायत कडून छोट्या व्यावसायिकांची थट्टा,पाच फुटाची सार्वजनिक.बांधकामची जागा दिली.सा. बांधकाम विभागाने उठण्यास सांगीतले.

Bybaba maske

Jun 21, 2023

नगरपंचायत कडून छोट्या व्यावसायिकांची थट्टा,पाच फुटाची सार्वजनिक.बांधकामची जागा दिली.सा. बांधकाम विभागाने उठण्यास सांगीतले.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज नगरपंचायत च्या भोंगळ कारभाराच अजून एक नमुना आज समोर आला.एकतर अतिक्रमण उठाव म्हणून नगरपंचायत मध्ये ठराव घेतला आणि आता चहूबाजूने विरोध होत असताना तात्पुरती मलमपट्टी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येणारी महामार्गावरची जागा जे की नगरपंचायतचा कुठल्याही अधिकारात येत नाही अशी पाच पाच फुटाची जागा छोट्या टपरीधारकांना वाटली.जागा मोजून देण्याचे व नगराध्यक्षा सह नगरसेवकाचा फौजफाटा घेऊन मोठ्या दिमाखात इव्हेंट साजरा केला.त्या नंतर थोड्याच वेळात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्या छोट्या टपरीधारकांना उठण्याची तंबी दिली गेली.जर नगरपंचायत छोट्या टपरीधारकांच्या भावनेशी असा खेळ खेळत असेल तर ही शरमेची बाब असल्याचे बोलले जात आहे.त्या नंतर लाला जाधव या पंक्चर दुकानदारास नगरपंचायत ने पाच फुट जागा दिली पण काहि वेळात त्या जागेचा जुना मालक येऊन त्याने त्याला हाकलून दिले असे लाला जाधव याने सांगीतले.केज शहरातील पुर्ण अतिक्रमण उठवले आहे तर मग ह्या सरकारी जागेचे मालक अजून जिवंत कसे यांच्या वर कोणी कारवाई करेल का? या सगळ्यात भाबांवलेली नगरपंचायत छोट्या टपरीधारकाची चेष्टा करतेय ती चेष्टा कोठे तरी थांबवून या गोरगरीब हातावर पोट असणाऱ्याना कायमस्वरूपी जागा द्यावी असे आता टपरीधारक बोलत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!