• Fri. Jun 5th, 2026

अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन आत्याचार. गुजरात राज्यातून मुलीसह आरोपी जेरबंद. 

Bybaba maske

Jul 3, 2023

अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन आत्याचार.

गुजरात राज्यातून मुलीसह आरोपी जेरबंद 

रोखठोक न्युज वार्ताहर 

 राहत्या घरी झोपलेल्या अल्पवयीन मुलीस फूस लावून एका तरुणाने तिला गुजरात राज्यातील वापी शहरात पळवून नेले. त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. केज पोलिसांनी वापी शहरात जाऊन मुलीची सुटका करीत आरोपीला जेरबंद केले. त्यास ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

   केज तालुक्यातील एका गावातील १७ वर्ष वयाची अल्पवयीन मुलगी ही १७ मे रोजी रात्री जेवण आटपून तिच्या रूममध्ये झोपली होती. त्यानंतर १८ मे रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास तिची आई घरकाम करण्यासाठी उठली. आईने तिला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा प्रतिसाद न मिळाल्याने रूममध्ये जाऊन पाहिले असता ती रुममध्ये नव्हती. तिचा शोध घेतला असता मिळून न आल्याने तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली असता मैत्रिणीचा चुलता बबन बबन दादाराव चौरे ( रा. तुकुचीवाडी ) हा, ती मुलगी आणि मैत्रीण हे तिघे एका शाळेत शिकायला असल्याने त्यांची ओळख असून ते दोघे बोलत असल्याचे सांगितले. त्यावरून मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून बबन दादाराव चौरे याच्याविरुद्ध पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.

       दरम्यान, तपासी अधिकारी फौजदार आनंद शिंदे यांनी त्या दोघांच्या मोबाईलचे लोकेशन काढले असता ते दोघे गुजरात राज्यातील वापी ( जि. वलसाड ) या शहरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर फौजदार शिंदे, पोलीस नाईक अनिल मंदे हे मोबाईल लोकेशनवरून वापी शहरात पोहचले. त्यांनी त्यांचा पत्ता शोधून काढत मुलीसह आरोपी बबन चौरे यास ताब्यात घेऊन केज ठाण्यात हजर केले. सदर अल्पवयीन मुलीस पळून नेऊन बबन चौरे याने तिच्यावर अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता ४ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!