• Fri. Jun 5th, 2026

पृथ्वीराज साठे शरद पवार सोबत.केज मतदारसंघात हमेशा सर्व पक्षीय नेते हे बेरजेचे व पैश्याचे राजकारण करतात.या वेळेस फासा सरळ पडला का?

Bybaba maske

Jul 5, 2023

पृथ्वीराज साठे शरद पवार सोबत.

केज मतदारसंघात हमेशा सर्व पक्षीय नेते हे बेरजेचे व पैश्याचे राजकारण करतात.

या वेळेस फासा सरळ पडला का?

रोखठोक न्युज 

केज विधानसभेतील माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी सोशल मीडियावर पोष्ट करून शरद पवार साहेबा सोबत असल्याच सांगितल आहे.राष्ट्रवादीत दोन गट पडल्या नंतर पुर्ण महाराष्ट्र भूकंप झाला आणी समान दोन ग्रुप पडले.बीड जिल्हा हा पुर्वी पासुन शरद पवारांना साथ देत अलेला जिल्हा आहे.जेंव्हा शरद पवार मुख्यमंत्रीपदी होते त्या वेळेस त्यांनी उपमुख्यमंत्री पद हे बीड जिल्ह्य़ातील सुंदरराव सोळंके यांना दिले होते.आज सुद्धा चार आमदार राष्ट्रवादी पक्षा चे आहेत.बीड जिल्ह्याचे राजकारण हे गटातटाचे राजकारण आहे.आणि या राजकीय नेत्याच्या लहान लहान गटात आता सगळ्यात मोठ भगदाड पडल ते म्हणजे शरद पवार व अजित पवार गट,कोणत्या गटात जायच या संभ्रमात असलेल सोशल मीडियावर पोष्ट करून सांगत आहेत.पण केज मतदार संघाचा विचार केला तर राष्ट्रवादीव भाजप ची ताकद आहे.या मतदारसंघात राष्ट्रवादी विखुरलेली असल्या कारणाने याचा फायदा भाजपला होतो.केज मतदारसंघात हमेशा सर्व पक्षीय नेते हे बेरजेचे व पैश्याचे राजकारण करतात.आज आम्ही तुम्हाला मदत करतो पुन्हा तुम्ही आम्हाला करा हा सगळ्यांचा हिशोब,तो कधी फोडायचा तो ज्यानी त्यानी ठरवयाचा.अश्या या राजकारणात 2019 च्या निवडणूकीत पृथ्वीराज साठेचा गेम झाला.त्या मुळेच वाटत त्यांनी ताक सुद्धा भुकन पिले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!