केज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ संजय राऊत यांची बीड येथे बदली.
रोखठोक न्युज केज
केज येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय राऊत यांची बीड येथे बदली झाली आहे.अत्यंत कर्तव्यनिष्ठ,संयमी व उत्कृष्ट फिजीशीयन व उत्तम प्रशासक, शिस्त प्रिय असलेले,केज उपजिल्हा रुग्णालयात जातीने लक्ष देणारे,स्वतः बाह्यरुग्ण विभागात बसुन रुग्णाची तपासनी करत असत.गोरगरीब लोंकाना फिजीशीयन असल्या कारणाने साखररोग,छातीविकार,उच्च रक्तदाब,अश्या विविध रोगावर स्वतः उपचार करत त्यामुळे त्यांची ख्याती पुर्ण तालुक्यात झाली होती.त्यांच्या कडे तपसाणी करण्या साठी दूरवरून नागरिक येत असत.सकाळी नऊ(9) च्या ठोक्याला रुग्णालयात हजर असणारे व संध्याकाळी सहा (6) वाजता घरी जाणारे वैद्यकीय अधीक्षक पहिल्यांदाच पाहीले त्यामुळे कर्मचारीवर्गाला सुद्धा शिस्त लागली होती.अश्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याची बदली झाली त्या मुळे सर्व सामान्य गोरगरीब जनतेतून हळहळ व्यक्त होत आहे.