• Wed. Jun 3rd, 2026

उत्साही कार्यकर्त्या मुळे आमदारांवर पत्रकारांचा रोष.

Bybaba maske

Jul 7, 2023

उत्साही कार्यकर्त्या मुळे आमदारांवर पत्रकारांचा रोष.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज मतदारसंघातील आमदार नमिताताई मुंदडा त्यांचे पती अक्षय मुंदडा व सासरे नंदकिशोर मुंदडा याच्या बाबतीत दैनिक पुण्यभूमी या मध्ये काही वृत प्रकाशित झाले होते.त्यामुळे केज शहरातील मन की बात मंडळ केज तालुका संयोजक सुनील घोळवे यांनी दैनिक पुण्यभूमी चे संपादक बाळासाहेब मस्के व केज तालुका प्रतिनीधी रोहन गंलाडे यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्यामुळे केज तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवानी ही अभिव्यक्त स्वतंत्राची गळचेपी असुन पत्रकारांची मुस्कटदाबी आहे.अश्या केसेस जर पत्रकारांवर होत असतील तर पत्रकारांना कोणा विषयी काहीच लिहीता येणार नाही.कुठल्या जनसेवकाने आपल्या विरोधात आलेली बातमी ही हसत स्वीकारली पाहीजे.असे अनेक उदाहरण महाराष्ट्रात आहेत.आचार्य अत्रे,बाळासाहेब ठाकरे,यशवंतराव चव्हाण,शरद पवार, यांचा केलेल्या टिपण्या खिलाडूवृत्ती ने घेतलेला इतिहास आहे.पण काही उत्साही कार्यकर्त्या मुळे जर अशी वेळ येत असेल तर नेत्याने सुद्धा त्या कार्यकर्त्याचे कान टोचले पाहीजे.दैनिक पुण्यभूमी च्या संपादक व तालुका प्रतिनिधी वरील गुन्हे माघे घ्यावेत म्हणून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना बीड येथे तसेच तलवाडा ता.गेवराई व जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुक्यात तसेच केज तालुक्यातील पत्रकार बांधवानी केज पोलीस ठाण्यात चे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना निवेदन दिले या वेळेस पत्रकार अशोक सोनवणे,मधुकर सिरसट,अनिल गंलाडे,दिपक नाईकवाडे,गौतम बचुटे,इक्बाल शेख, धनजंय घोळवे,महादेव काळे,श्रीराम तांदळे,रंजित घाडगे,आरेफ इनामदार,रोहन गंलाडे उपस्थित होते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!