राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २७ तारखेच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा – कपिल मस्के
रोखठोक न्युज वार्ताहर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड येथे २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आयोजीत जाहीर सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची अस्मिता अन सन्मानाची आहे. रविवार दि. २७ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी वाजता होणाऱ्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा.स्थळ स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग बप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली खुप मोठ्या संख्येत युवक घेवुन जाणार आहोत तुम्हीपण या.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कपिल मस्के यांनी असे आवाहन केले आहे तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ते, पदाधिकारी,सेल पदा अधिकारी , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब, बजरंग सोनवणे यांच्या वर जिवापाड प्रेम करणाऱ्या सर्व केज तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड येथे २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आयोजीत जाहीर सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची अस्मिता अन सन्मानाचा दुष्काळ मिटवण्याचा आहे.तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे केज तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सर्कल मधुन मोठ्या संख्येने सभेला उपस्थित रहावे असे आवाहन कपिल मस्के यांनी केले आहे.