केज तालुक्यावर पुन्हा अन्याय दोन महत्वाचे महसूल क्षेत्र नादुंर व विडा याना वगळून पीकविमा अग्रीम मंजूर.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यातील सर्वात मोठे महसूल असलेले नादुंर व विडा हे दोन महसूल मंडळे वगळून पिकवीमा अग्रीम मंजूर केला आहे.केज तालुक्यात पावसाची स्थिती सर्वत्र सारखीच असतना एका मंडळाला एक न्याय तर दुसर्याला वेगळा असे कसे होऊ शकते.गेल्या आठवडय़ात 9 महसूल मंडळे वगळून पिकवीमा अग्रीम जाहीर केले होते.पण शेतकऱ्यांच्या अंदोलनाच्या दठ्याने काल 9 पैकी 7 मंडळाचा अग्रीम मंजूर केला तर मग ह्या विडा व नांदुरघाट सारख्या मोठ्या महसूल मंडळातील शेतकरीवर्गाने काय पापा केले ते समजे नासे झाले आहे.तरी उर्वरित दोन मंडळाचा लवकरात लवकर सामील करून घ्यावा नाहीतर शेतकरीवर्ग अंदोलन करण्या साठी रस्त्यावर उतरेल असा इशाराच दिला आहे.