• Fri. Jun 5th, 2026

पोलीसांची धडाकेबाज कारवाई 27 लाखाचा गांजा छापा टाकून धरला.

Bybaba maske

Sep 13, 2023

पोलीसांची धडाकेबाज कारवाई 27 लाखाचा गांजा छापा टाकून धरला.

रोखठोक न्युज वार्ताहर 

 दिनांक 12/03/2023 रोजी मा. पंकज कुमावात साहेब, सहा. पोलीस अधीक्षक केज यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, घोगसपारगाव ता शिरूर कासार येथे संभाजी कराडे नावाचा इसमाने त्याच्या शेतात गांजा लागवड केली आहे, सदर बाबत मा. पोलीस अधीक्षक बीड नंदकुमार ठाकूर यांचे मार्गदर्शन घेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत पोलीस निरीक्षक राजेश पाटील, पोलीस निरीक्षक शिंदे, पो ना दिलिप गित्ते, अनिल मंदे , पो हे डापकर, पो शि संतोष गित्ते यांच्या टिमने घोगसपारगाव येथे जाऊन मिळालेल्या बातमीची खात्री करता सदर शेतामध्ये जाऊन छापा मारला असता 554 कीलो गांजा किंमत एकुण 27,27,700/-रू किमतीचा गांजा लागवड केलेला मिळुन आल्याने, आरोपिस ताब्यात घेऊन त्यास चकलांबा पोलीस स्टेशन येथे आणून पि एस आय राजेश पाटील यांचे फिर्याद वरुन NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!