• Fri. Apr 24th, 2026

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या तत्परतेने व त्यांच्या पथकाच्या कर्तव्यदक्षतेने दोन हरणांचे प्राण वाचवले.            

Bybaba maske

Sep 14, 2023

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या तत्परतेने व त्यांच्या पथकाच्या कर्तव्यदक्षतेने दोन हरणांचे प्राण वाचवले.

 

 

रोखठोक न्युज वार्ताहर 

आज दिनांक 14/09/2023 रोजी सहाय्यक पोलीस अध्यक्ष पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली तांबवा शिवारामध्ये काही लोक हरणाची शिकार करून घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्याने सदरची माहिती पंकज कुमावत यांनी त्यांचे पथकातील बालासाहेब डापकर, विकास चोपणे, दिलीप गीते, अनिल मंदे, यांना देऊन तात्काळ सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर ठिकाणी शिवारामध्ये गेलो असता पोलिसांना पाहून काही लोक पळून गेले. पोलिसांनी त्या शेतामध्ये आजूबाजूला पाहणी केली असता त्या शेतामध्ये दोन जिवंत हरणे एक मादी आणि एक नर जातीचे पायाला बांधून ठेवलेली दोन हरणे दिसले.

लागलीच त्याची माहिती वन विभागातील वनआधिकारी वरवटे यांना देऊन त्यांचे टीम तात्काळ तांबवा शिवारामध्ये कामट शेतामध्ये दाखल झाली वन विभागातील अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी येऊन त्यांनी सविस्तर पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही हरणांना मुक्त केले आहे.

पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आज दोन्ही हरणांचे प्राण वाचले आहेत.

सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील कर्मचारी बालासाहेब डापकर, विकास चोपणे ,दिलीप गीते, अनिल मंदे

तसेच वन विभागातील अधिकारी व कर्मचारी यु .एस. चिकटे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर वरवडे, वन परिमंडळ अधिकारी धारूर, एन आर पाईक वनरक्षक, व्ही एन भालेराव, एचडी पारवे यांनी सदरची कारवाई केली आहे

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!