• Fri. Apr 24th, 2026

असंवेदनशील नगराध्यक्ष किंवा नगरपंचायतचा साधा  लिपीक सुद्धा रस्ता रोको कडे फिरकले नाही.

Bybaba maske

Sep 18, 2023

असंवेदनशील नगराध्यक्ष किंवा नगरपंचायतचा साधा  लिपीक सुद्धा रस्ता रोको कडे फिरकले नाही

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज नगरपंचायत विरोधात केज संघर्ष समीती यांनी आज दिनांक 18/9/2023 रोजी विविध नगरपंचायत च्या हद्दीतील मागण्या साठी जे की केज शहरातील मुलभूत गरजे साठी गरजेच होत. केज-अंबाजोगाई रोडवर केजडी नदीच्या पुलावर हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केले पण या आंदोलनाचे निवेदन स्विकरण्या साठी ना नगराध्यक्ष हजर ना मुख्यधिकारी हजर ना साधा लिपीक सुद्धा, नगरपंचायत ने पाठवला नाही ऐवढी असंवेदनशीलता कोठून येते.आता पर्यंत आमदार नमिताताई मुंदडा यांच्या निधीतून होत असलेल्या कामा चे श्रेय घेणारे सत्ताधारी ज्या वेळेस नगरपंचायत ला प्रश्न विचारले जाते त्या वेळेस तोंड का लपवते?तुम्हाला निवडून दिलेली जनता जर रस्त्यावर उतरत उपोषण,रस्तारोको करत असेल तर तुम्हाला त्याची दखल जर घ्यावी वाटत नसेल तर अश्या असंवेदनशील नगरपंचायत व त्यांच्या कारभारयाना जनता एक दिवसी जागा दाखवल्या शिवाय रहाणार नाही.असे जनतेतून बोलले जात आहे.अगदी तळमळीन केज शहराचे प्रश्न मांडणाारे हनुमंत भोसले. आपल्या सोबत किती याचा विचार न करता आपण शहरा साठी किती करू शकतो फक्त याचाच विचार करणारे हनुमंत भोसले आज त्यांच्याच आंदोलन कडे पाठ भिरवल्याने शहरात अश्चर्य व्यक्त केले जात आहे.एक अदर युक्त असलेल व्यक्तीमत्व आज त्यांच्या आंदोलना ला दिलेली वागणूक पाहून नागरिक थक्क झाले आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!