• Wed. Aug 26th, 2026

केज तालुक्याला एक छद्दाम ही नाही तर मराठवाड्याला 46 हजार कोटीचा निधी मंजूर.तर फक्त गायी जतन व संभाळण्याचे काम अंबाजोगाई ला दिले.

Bybaba maske

Sep 17, 2023

केज तालुक्याला एक छद्दाम ही नाही तर मराठवाड्याला 46 हजार कोटीचा निधी मंजूर.

तर फक्त गायी जतन व संभाळण्याचे काम अंबाजोगाई ला दिले

बाबासाहेब  मस्के.

मराठवाडा मुक्ती दिना निमित्त काल छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली यात मराठवाड्याचा कायापालट करण्यासाठी 46 हजार कोटीचा रूपयाचा विकास आराखडा जाहीर केला.बीड जिल्ह्यातील विविध विकास कामा साठी निधी मंजूर केला पण केज तालुक्या साठी एक नया छद्दाम सुद्धा दिला नाही.जवळ जवळ बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला निधी मंजूर झाला पण केज ला का वगळण्यात आले?केज मतदार संघ राखीव प्रवर्गात येत म्हणून तर हा अन्याय नाहीना.वडवणी सारख्या लहान तालुक्याला सुद्धा एम आय डी सी मंजूर केली आहे पण केजला नाही 144 गावाचा तालुका असलेला केज या ठिकाणी खूप दिवसांपासून एम आय डि सी ची मागणी आहे.तालुक्यात बेरोजगाराचे लोंढेचे लोंढे फिरतायत हाताला काम नाही.शेती शाश्वत नाही,त्या मुळे एम आय डी सी मंजूर होणे अपेक्षित आहे.केज तालुक्याचा पाण्याचा भार एकट्या धनेगाव प्रकल्पा वर आहे त्यावर तीन जिल्ह्याची मदार आहे.त्याला भविष्यात काही तरी पर्याय पाहीजे.पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान सारखे उद्यान धनेगाव प्रकल्पावर होईल ही अपेक्षा होती!ती ही फोल गेली.

केज मतदारसंघाच्या हिशोबाने शासनाने गायी सांभाळण्याच काम दिल.

केज मतदारसंघाच्या हिशोबाने अंबाजोगाई येथे गोवंश जतन केंद्र तेवढ मंजूर केले आहे.लाल कंधारी व देवणी गोवंश प्रजातीचे जतन व संगोपन अंबाजोगाई तालुक्यातील साकुड येथे करण्या साठी 6 कोटीचा निधी तेवढा मंजूर करण्यात आला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!