• Fri. Apr 24th, 2026

मोटार सायकल घसरून एक गंभीर तर एक किरकोळ जखमी

Bybaba maske

Sep 15, 2023

 मोटार सायकल घसरून एक गंभीर तर एक किरकोळ जखमी

रोखठोक न्युज वार्ताहर 

गौतम बचुटे/केज :- केज-कळंब रोडवर साळेगांव येथे वीज उपकेंद्रा जवळ मोटार सायकल घसरून एकजण गंभीर तर एक किरकोळ जखमी झाला आहे

शुक्रवार दि. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:४५ वा. च्या सुमारास विक्रम नाना शिंदे वय ४५ वर्ष आणि त्याचा पुतण्या बालू शिंदे वय १५ वर्ष दोघे रा पिंपळगाव ता केज हे मोटार सायकल क्र. (एम एच २४/झेड ४६४९) वरून कळंब कडून पिंपळगावकडे जात असताना साळेगांव येथे वीज उपकेंद्रा जवळ समोर जनावर आडवे आल्याने मोटारसायकल वरून पडून जखमी झाले. विक्रम शिंदे याच्या डोक्याला मार लागला असून त्याचा पुतण्या बाळू शिंदे हा किरकोळ जखमी झाला आहे.

दरम्यान पत्रकार गौतम बचुटे यांना अशोक बचुटे यांच्याकडून माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन रुग्णवाहिकेला कॉल केला. त्या नंतर रुग्णवाहिका चालक बारगजे व रुग्णवाहिका कर्तव्या वरील वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा मोटे या अपघातस्थळी दाखल झाल्या. पत्रकार जय जोगदंड, अक्षय वरपे, अजय बचुटे, दशरथ राऊत, बाळू गायसमुद्रे, रितेश बचुटे यांच्या मदतीने जखमीला रुग्णवाहिकेतुन उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचारासाठी हलविले आहे.

केज पोलीस ठाण्याचे प्रभारी बाळासाहेब पवार यांच्या आदेशावरून पोलीस नाईक राजू गुंजाळ देखील अपघातस्थळी हजर झाले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!