• Fri. Apr 24th, 2026

भरधाव कारने दुचाकीला उडवले दोघे गंभीर जखमी.

Bybaba maske

Sep 19, 2023

भरधाव कारने दुचाकीला उडवले दोघे गंभीर जखमी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

धारुर तालुक्यातील चोरांबा परिसरात आज दि.19 मंगळवारी भरधाव कारने दुचाकीला उडवून झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून कारचालक फरार झाला आहे.

धारुर शहरापासून जवळच असलेल्या घाटपायथ्याला अरणवाडी व चोरांबा या गावात राष्ट्रीय महामार्ग क्र 548 सी या रस्त्यावर अपघाताची शृंखला सुरुच आहे. दि.8 सप्टेंबर रोजी अवघ्या काही तासात बसेसचे तीन तर एका दुचाकीस ट्रकने उडवल्याची घटना घडली होती. हि घटना ताजी असतानाच आज दि.19 रोजी चोरांबा येथील हॉटेल राधिका समोर धारुरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या एका स्विफ्ट कारने (क्र. एमएच 08 एएन 2460) धारुरहून तेलगावकडे जात असलेल्या दुचाकीला (क्र. एमएच 44 एफ 2385) जोरात धडक दिली. अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले असून कारने विरुद्ध दिशेला जावून जोरात समोरासमोर धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात कारचा समोरील भाग चेंदामेंदा झाला असून एअरबॕग उघडली आहे. कार चालक फरार झाला असून जखमींना स्थानिक ग्रामस्थांनी दवाखान्यात हलविले. जखमींची नावे मात्र कळू शकली नाहीत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!