• Fri. Apr 24th, 2026

बस मोटारसायकलच्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार.

Bybaba maske

Sep 20, 2023

बस मोटारसायकलच्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज-अंबाजोगाई रोडवर पुन्हा एक भीषण अपघात झाला असून यामध्ये केज तालुक्यातील तांबवा येथील रहिवासी संभाजी शिवाजी कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरील घटना केज अंबाजोगाई रोडवरील सोनिजवळा पाटी नजीक झाला आहे.

तालुक्यातील तांबवा येथील संभाजी शिवाजी कुलकर्णी यांना एसटी महामंडळाच्या गंगाखेड – पुणे बसणे जोराची धडक दिली. आणि धडक दिल्यानंतर दीडशे ते दोनशे फूट ते मोटरसायकल सह फरफट गेले. यामध्ये संभाजी कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, मागच्या आठवड्यामध्ये त्याच ठिकाणी जवळबन येथील दुचाकी आणि कारचा अपघात होऊन यामध्ये एका युवकाला आपले प्राण गमवावे लागले होते,आहे.आणि त्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा तांबवा येथील तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.अपघात स्थळा च्या ठिकाणी रोड च्या दोन्ही बाजूस हाॅटेल असल्याने येथे नेहमीच वरदळ असते व तेथे चौफळा आहे एक बाजूस सोनीजवळा तर दुसर्‍या बाजूस पिसेगाव व केज अंबाजोगाई हायवे त्यामुळे त्या ठिकाणी ना दिशा दर्शक किंवा गतिरोधक असने गरजेच आहे. सदरील अपघात मंगळवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान घडला. घटनेची माहिती मिळताच 108 चे डॉक्टर सचिन सूर्यवंशी आणि पायलट श्री. मुंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र उपचारापूर्वीच संभाजी शिवाजी कुलकर्णी यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता.संभाजी कुलकर्णी हा पुर्ण तालुक्यात संभा व देवबाप्पा नावाने परिचित होता सदा हसतमुख असणार हा युवकाचा दुर्दैवी अपघात झाल्याने पंचक्रोशीतील हळहळ व्यक्त होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!