केजमध्ये शिक्षणाचा मोकाट काळा बाजार ! खाजगी क्लासेसची मनमानी कारभार
रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहरात सध्या शिक्षणाचा काळा बाजार चालू आहे खासगी क्लासेसच्या माध्यमातून भरमसाठ लुट चालू आहे.स्पर्धात्मक परीक्षा सोडल्या तर केजीपासून कॉलेजपर्यंत प्रायव्हेट कोचिंग क्लासेसच्या रूपाने एक पर्यायी शिक्षण व्यवस्था केज शहरात चालू आहे. कोणत्याही शिक्षणाचा काळा बाजार चालू त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस ही आपल्या शिक्षण व्यवस्थेला लागलेला एक शाप आहे. जितकी तास मुले शाळेत बसतात, तितकीच तास कोचिंग क्लासमध्ये बसतात. हा एक बिझनेस झाला आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे.केज तालुक्यात खाजगी छोटे मोठे कोचिंग क्लासेस यांचा मनमानी कारभार चालतो त्या वर कुठल्याही प्रकारचे नियम नाहीत.ऐकाद्या विद्यार्थ्यांनी फीस वेळेवर नाही भरली तर त्या विद्यार्थ्यांना क्लासला जाता येत नाही आशा प्ररकारचा भोगळ कारभार खाजगी कोचिंग क्लासेस केज तालुक्यात चालु आहे.केज तालुक्यात कोचिंग क्लासेस फक्त शाळा-कॉलेजपुरते मर्यादित राहिलेले नाही. विविध विषयाचे क्लोचिंग क्लासेस चालतात. त्यातून क्लास चालवणारे कोट्यवधी रुपये कमावतात. मात्र त्यांची सरकार दरबारी नोंद नाही. सुविधा नाही, सुरक्षितता नाही. वेतनाबाबत नियमन नाही. शाळा-कॉलेजच्या अभ्यासक्रमासह विविध विषयांचे खासगी क्लासेस चालविले जातात. अशा क्लासेसमध्ये प्रवेश घेणे पूर्णतः विद्यार्थी आणि पालक यांना ऐच्छिक असते. सद्यस्थितीत खासगी क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाची यंत्रणा नाही. खासगी क्लासेसची सरकार दरबारी नोंदघेण्यासाठी किंवा त्याची तपासणीकरिता कोणतेही धोरण नाही. हे क्लासेस पूर्णतः व्यावसायिक दृष्टिकोनातून चालविले जातात.त्यामुळे केज तालुक्यात खाजगी कोचिंग क्लासेसचा मनमानी भोंगळ कारभार केला आहे असे नागरिकांतून म्हटले जात आहे.
चौकट
केज शहरात जो खाजगी कोचिंग क्लासेस चा मनमानी कारभार चालू आहे यावर गटशिक्षणाधिकारी यांनी तात्काळ कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार.