• Tue. Aug 4th, 2026

जमिनीच्या कारणा वरून काठ्या व धारदार शस्त्र हातात घेऊन तुंबळ हाणामारी !

Bybaba maske

Sep 23, 2023

जमिनीच्या कारणा वरून काठ्या व धारदार शस्त्र हातात घेऊन तुंबळ हाणामारी !

रोखठोक न्युज  

गौतम बचुटे/केज :- केजमध्ये जमिनीच्या कारणा वरून काठ्या आणि धारदार शस्त्र घेऊन तुंबळ हाणामारी झाली आहे.

शेख जुनेद शेख शाकेर यांनी दि. २१ सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, केज येथील जुन्या दूध डेअरीच्या पाठी मागील भागात ते आणि त्यांची पत्नी व नातेवाईक यांच्या नावे सर्वे नं. २१८ मध्ये ४१ गुंठे जमीन आहे. त्याचे एन ए ले-आऊट होवुन ही जमीन त्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी त्या जमिनीच्या चारही बाजुंनी सिमेंटचे खांब लावलेले आहेत.

दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वा. च्या सुमारास शेख जुनेद व त्यांच्या पत्नीच्या नातेवाईकाचे मालकीच्या सर्वे नं. २१८ मध्ये ४१ गुंठेच्या जागेत ते स्वतः आणि शेख मुस्तकीम जब्बार, शेख इरशाद अली, शेख अहेमद हुसेन, शेख तारेक ताहेर व मजुर काम करीत होते. तेव्हा दुपारी १२:०० वा.च्या सुमारास सय्यद कलीम अहेमद उर्फ कल्ल्या दादा, शेख युनुस चाँद, शेख अजीम युनुस, शेख इस्माईल युनुस, शेख अन्वर अयुब, शेख मैनोद्दीन युसुफ, शेख अस्लम युसुफ, शेख रफीक अयुब आणि तीन ते चार अनोळखी इसम असे एकूण अकरा ते बारा इसम हातात काठ्या व धादार शस्त्र घेवुन आले. कलीम व युनुस हे दोघे जुनेदला म्हणाले की, तुम्ही इथे काम करायचे नाही. ही जमीन तुम्ही आम्हाला विक्री करा. असे म्हणून शिवीगाळ करुन खाली पाडुन चापटा-बुक्क्याने व लाथा-बुक्क्याने मारहान केली. तसेच त्या सर्वांनी जिवे मारुन टाकण्याची धमकी दिली आणि जमिनीवर लावलेले सिमेंटचे खांब मोडुन टाकुन नुकसान केले.

या प्रकरणी जुनेद शेख याच्या फिर्यादी वरून सय्यद कलीम उर्फ कल्ल्या दादा, शेख युनुस, शेख अजीम, शेख इस्माईल, शेख अन्वर, शेख मैनोद्दीन, शेख अस्लम, शेख रफीक आणि अनोळखी इसम यांच्या विरुद्ध गु. र. न. ५६९/२०२३ भा. दं. वि. १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ४२७, ५०४ ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बाळासाहे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार श्रीकांत चौधरी हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!