खाजगी क्लासेस मुळे गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात !. गल्लेलठ पगारवाले शाळेतील शिक्षकच घेतात कोचिंग क्लासेस. भाग 2
रोखठोक न्युज
केज शहरात सध्या शिक्षणाचा काळा बाजार चालू आहे खासगी क्लासेसच्या माध्यमातून भरमसाठ लुट चालू आहे.स्पर्धात्मक परीक्षा सोडल्या तर केजीपासून कॉलेजपर्यंत प्रायव्हेट कोचिंग क्लासेसच्या रूपाने एक पर्यायी शिक्षण व्यवस्था केज शहरात चालू आहे. तसेच नोकरी असलेले शिक्षक दुय्यम फायदा करून घेण्यासाठी शाळावर नोकरी करत आहेत व दुसरी क्लासेसची कुठल्याही प्रकारची नोंदणी नसते परंतु स्वताच्या स्वार्था साठी दुय्यम नोकरी करत आहेत व कोणत्याही शिक्षणाचा काळा बाजार चालू त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस ही आपल्या शिक्षण व्यवस्थेला लागलेला एक शाप आहे. जितकी तास मुले शाळेत बसतात, तितकीच तास कोचिंग क्लासमध्ये बसतात.व कोचिंग क्लासेस चे शिक्षक दुय्यम पध्दतीने पैसे कमावण्या साठी शाळेतील विद्यार्थ्यांन वर लक्ष देत नाहीत असे काही पालकाचें म्हणणे आहे.व गरीब कुटुंबातील विद्यार्थी क्लासेस लाऊ शकत नाहीत व त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. क्लासेसवर त्यामुळे नियंत्रण आणण्याची गरज आहे.केज तालुक्यात खाजगी छोटे मोठे कोचिंग क्लासेस यांचा मनमानी कारभार चालतो त्या वर कुठल्याही प्रकारचे नियम नाहीत.ऐकाद्या विद्यार्थ्यांनी फीस वेळेवर नाही भरली तर त्या विद्यार्थ्यांना क्लासला जाता येत नाही.त्या विद्यार्थ्यांचा भर वर्गात उठवून अपमान केला जातो आशा प्रकारे हिटलर शाही खाजगी कोचिंग क्लासेस केज तालुक्यात चालु आहे.केज तालुक्यात कोचिंग क्लासेस फक्त शाळा-कॉलेजपुरते मर्यादित राहिलेले नाही. विविध विषयाचे क्लोचिंग क्लासेस चालतात. त्यातून क्लास चालवणारे कोट्यवधी रुपये कमावतात. ना सरकारला इन्कम टॅक्स जातो, त्यांची सरकार दरबारी नोंद नाही. सुविधा नाही, सुरक्षितता नाही. वेतनाबाबत नियमन नाही. शाळा-कॉलेजच्या अभ्यासक्रमासह विविध विषयांचे खासगी क्लासेस चालविले जातात. अशा क्लासेसमध्ये प्रवेश घेणे पूर्णतः विद्यार्थी आणि पालक यांना ऐच्छिक असते. सद्यस्थितीत खासगी क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाची यंत्रणा नाही. त्यामुळे केज तालुक्यात खाजगी कोचिंग क्लासेसचा मनमानी भोंगळ कारभार चालू आहे असे विद्यार्थ्यातून व गरीब पालक यांचे म्हणणे आहे.