• Fri. Apr 24th, 2026

पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर जेवायला न्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला : संवाद बैठक

Bybaba maske

Sep 25, 2023

पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर जेवायला न्या

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पदाधिकाऱ्यांना अजब सल्ला : संवाद बैठक

रोखठोक न्युज वार्ताहर 

पत्रकारांनी २०२४ पर्यंत | आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना धाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर येथे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.

बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.२४ ) शहरातील सावेडी येथील माउली सभागृहात महाविजय २०२४ विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बुथरचना आणि पदाधिकाऱ्यांनी सांभाळायच्या जबाबदाऱ्या या विषयावर बावनकुळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ज्या बुथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक

मीडियावाले कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतोय, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकवाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला. त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच. महाविजय २०२४ पर्यंत बुथच्या संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही याची काळजी घ्या, सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत, याची काळजी घ्या, असे बावनकुळे म्हणाले.

दरम्यान बावनकुळे यांच्या उपस्थितीत नगर शहरातील माणिक चौकात मन की बात हा कार्यक्रम झाला. त्यानंतर त्यांनी तेलीखुंटपर्यंत पायी जात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे नागरिकांनी विविध ठिकाणी स्वागत केले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!