• Tue. Aug 25th, 2026

केज स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर पि.एन.ठोंबरे यांचा एक बँकेच्या महिला ग्राहकाचा मानसिक छळ.

Bybaba maske

Sep 25, 2023

केज स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर पि.एन.ठोंबरे यांचा एक बँकेच्या महिला ग्राहकाचा मानसिक छळ.

रोखठोक न्युज वार्ताहर

सविस्तर वृत्तांत असा कि केज स्टेट बँक ऑफ इंडियाची महिला ग्राहकास स्टेट बँक ऑफ इंडिया या नावाने जयपूर(राजस्थान)येथून स्पॅम काॅल आला.तुमच्या खात्यातून 1 लाख रूपय काढले का? पण महिलाने त्यास उत्तर न देता फोन ठेवला.त्या दिवसापासून त्यांचे डिजिटल व्यवहार करणारे ॲप फोन पे व गुगल पे बंद झाले.आज काल कोणीही खिशात पैसे न ठेवता डिजिटल पेमेंट कडे लोकांचा जास्त कल आहे.त्याच प्रमाणे महिलेने बँकेत जाऊन चौकशी केली असता श्री इंगोले यांनी तुमचे खाते सुरक्षित असून काहीही झाले नाही पण जे बाहेरचे डिजिटल फोन पे,गुगल पे आमच्या आखतारीत येत नाही.पण सदरील महिलाचे मुले शिक्षणा साठी बाहेर असल्या कारणाने त्यांचा किराया,मेसचे पैसे किंवा इतर कुठलेही मोबाईल नंबर वरून होणारे व्यवहार थांबल्याने ते चालु करायची विंनती मॅनेजर पि.एम ठोंबरे यांना केली पण कुठलीही मदत त्यानी केली नाही शेवटी त्यांनी संबधीत बँकेच्या ग्राहक तक्रार केंदाशी बोलल्या नंतर त्यांनी सांगीतल की तुमचे अकाऊंट सी जोडलेले युपीआया(UPI)Unified payment interface नंबर हॅकर ने ब्लाॅक केला आहे तो बँकेत जाऊन चालु करा तसा अर्ज द्या.तुमचे सगळे व्यवहार चालू होतील.अर्ज घेऊन गेल्या नंतर अर्ज घेण्यास मॅनेजर ने नकार देऊन असा UPI(Unified payment interface) नंबर वगैरे काही नसतो म्हणून त्यांची बोळवण केली.ज्या मॅनेजर ला युपीआय नंबर माहित नाही किंवा माहित असुन ही पंधरा दिवस बँकेत हेलपाटे घालाय लावणाऱ्या व अश्या प्रकारची मानसिक छळ करणाऱ्या बँक मॅनेजर याची या शाखेतून बदली करावी किंवा चौकशी करून निलंबित करावे.अशी मागणी होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!