• Tue. Aug 25th, 2026

“लढा वंचितांच्या सत्तेचा” या बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेच्या आढावा बैठकीला जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांच्या नेतृत्वात प्रचंड प्रतिसाद.

Bybaba maske

Sep 25, 2023

“लढा वंचितांच्या सत्तेचा” या बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेच्या आढावा बैठकीला जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांच्या नेतृत्वात प्रचंड प्रतिसाद.

रोखठोक न्युज वार्ताहर 

काल दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी अंबाजोगाई या ठिकाणी विलासराव देशमुख सभागृहामध्ये दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी होऊ घातलेल्या “लढा वंचितांच्या सत्तेचा” या महासभेच्या नियोजनासाठी ची बैठक मराठवाडा अध्यक्ष अशोक भाऊ हिंगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा बीड जिल्हा प्रभारी प्रा. किशन चव्हाण सर, शिस्त व तक्रार निवारण समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष प्रा. विष्णू जाधव सर, तृतीयपंथी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या नंदिनी ताई उपस्थित होत्या. या बैठकीचे नियोजन अंबाजोगाई वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष ख्वाजा मिया पठाण,भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आयुष्यमान भारत सातपुते, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गोविंद मस्के, महिला आघाडीच्या प्रतिनिधी बगाडे ताई, जाधव ताई, बीड पूर्वचे उपाध्यक्ष सचिन भैय्या उजगरे उर्फ वंचितांचे (आनंद दीघे )अमोल भैया पौळे धम्मानंद जी कासारे वंचित बहुजन आघाडी शहर महासचिव नितीन सरवदे आदींनी परिश्रम घेतले. या बैठकीला बीड जिल्हा पूर्व विभागातील परळी, अंबाजोगाई, केज, धारूर, वडवणी, तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीमध्ये दिनांक 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सभेच्या अनुषंगाने अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले या बैठकीचे आभार प्रदर्शन वंचित बहुजन आघाडीचे अंबाजोगाई शहर महासचिव नितीन सरवदे यांनी केले या बैठकीला आदिवासी, शिकलकरी, तृतीयपंथी समाजातील अनेक जण उपस्थित होते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!