• Fri. Apr 24th, 2026

बसने मोटारसायकल स्वारास चिरडले.मोटारसायकल चालक ठार.

Bybaba maske

Oct 1, 2023

बसने मोटारसायकल स्वारास चिरडले.मोटारसायकल चालक ठार.

रोखठोक न्युज वार्ताहर 

 धारुर शहरालगतच एस. टी. महामंडळाच्या बसने एका मोटारसायकल स्वारास चिरडल्याची घटना दुपारी घडली. यात मोटारसायकल स्वार ठार झाला असून दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळंबहून माजलगावकडे जाणाऱ्या बसने (क्र. एमएच 14 बीटी 2534) धारुरहून मैंदवाडीकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराला समोरासमोर धडक दिली. धडक इतकी जबर होती की मोटारसायकल (क्र.एमएच 44 जे 9207) व दुचाकी चालक थेट बसच्या खाली मधोमध अडकले. यात मोटारसायकल चालक चंद्रभान भगवान मैंद रा. मैंदवाडी ता.धारुर ( अंदाजे वय 52) जागीच ठार झाला. तर दुचाकीचे अक्षरशः तुकडे झाले. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक गोविंद बाटे पुढील तपास करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!