पिसेगाव जि.प.शाळेत शालेय पोषण आहारामुळे भाजलेल्या विद्यार्थीनीला न्याय देवून घटनेची चौकशी करा.
रोखठोक न्युज वार्ताहर
तालुक्यांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिसेगाव ही ऐके काळी जिल्ह्यातील क्रमांक एक ची शाळा म्हणून ओळख होती. या वैभवशाली शाळेला सध्या उतरती कळा लागल्याचे बोलले जात आहे.
येथील विद्यमान मुख्याध्यापक राजगीरे हे नशापान करून शाळेत येतात.त्यांचा शालेय प्रशासनावर प्रभाव नाही यामुळे गुणवत्ते सोबतच शिस्त व कार्यपध्दती बिघडलेली आहे.
अशातच दि.३० सप्टेंबर २०२३ रोजी ईयत्ता दुसरी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कु.राधीका झुंबर गिरी या मुलीच्या अंगावर शालेय पोषण आहारातील वरण सांडून ती गंभीर जखमी झालेली असून तिला प्राणांतीक वेदना होत आहेत.
तरी या मुलीला न्याय मिळवून देवून बेजबाबदारपणे वागणाऱ्या मुख्याघ्यापकाविरूध्द कारवाई करावी अशी मागणी मुलीच्या नातेवाईकांनी प्रा.ईश्वर मुंडे,प्रदेश सरचिटणीस,राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी,ओबीसी सेल यांच्या कडे केली होती.
या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन प्रा.ईश्वर मुंडे यांनी बाल हक्क आयोगाच्या सदस्या, ॲड सौ.प्रज्ञाताई खोसरे यांच्या कडे या घटनेची लेखी तक्रार केली.
या वेळी त्यांच्या सोबत ॲड.राजेश्वर चव्हाण जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी,जिल्हा बीड हे होते.
या तक्रारीची दखल घेऊन ॲड.सौ.प्रज्ञाताई खोसरे यांनी पिसेगाव येथे जाऊन सदरील मुलीची भेट घेतली.तिच्या तब्बेतीची व घटनेची चौकशी करून दोषी विरूध्द योग्य कारवाई प्रस्तावात करू असे सांगितले आहे.
या घटनेची तक्रार मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.बीड यांचे कडे ही करून सदरील विद्यार्थीनीला न्याय मिळवून देवून दोषी विरूध्द कारवाई करण्यास भाग पाडणार असल्याचे प्रा.ईश्वर मुंडे यांनी सांगीतले.
