गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनीचे अपहरण केले आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आवसगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १४ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीचे दि. ३० सप्टेंबर रोजी रात्री ११:४५ वा. च्या सुमारास सागर मारोती इंगळे (रा. आवसगाव ता. केज) याने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारी वरून सागर मारोती इंगळे याच्या विरुद्ध गु र नं २१८/२०२३ भा दं वि ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास तुपारे हे करीत आहेत.