• Fri. Apr 24th, 2026

पंकज कुमावत यांची बीड शहरातील चार ऑनलाइन जुगार अड्ड्यावर धाडसी कारवाई ३ लाख १४ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेत अकरा जणां विरुद्ध गुन्हा दाखल

Bybaba maske

Oct 3, 2023

पंकज कुमावत यांची बीड शहरातील चार ऑनलाइन जुगार अड्ड्यावर धाडसी कारवाई

३ लाख १४ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेत अकरा जणां विरुद्ध गुन्हा दाखल

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने बीड शहर हद्दीमध्ये चार ठिकाणी ऑनलाईन चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाडसी कारवाई करीत ३ लाख १४ हजार रु.चा मुद्देमाल ताब्यात घेत सहा जणा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दि. २ रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना अशी माहिती मिळाली की, बीड शहर आणि पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ऑन लाईन जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहिती वरून पंकज कुमावत आणि त्यांच्या

 यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस जमादार बालासाहेब डापकर, दिलीप गित्ते, अनिल मंदे, महादेव बहिरवाळ, प्रकाश मुंडे, भरत शेळके यांनी त्या ठिकाणी चालत असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. या वेळी शहरातील देविदास सोनाजी जगताप हा काही इसमाना घेऊन त्याच्या गाळ्यामध्ये ऑनलाइन बिगो, चक्री नावाचा जुगार खेळत होता. पोलिसांनी त्याच्या कडून लॅपटॉप, एलईडी स्क्रीन, जुगाराचे साहित्य, मोबाईल व नगदी रक्कम असा एकुण किंमती २,६३,३००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी देविदास सोनाजी जगताप व इतर तीन साथीदार आरोपी, जागा मालक व आयडी देणारा आरोपी नामे आनंद शेटे असे एकूण सहा आरोपी यांचेवर गुन्हा दाखल केला आहे.

तसेच पेठ बीड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ऑनलाइन बिंगो लॉटरी, सुरट व मटकाच्या तीन वेगवेगळ्या रेड करून एकूण पाच आरोपी विरुद्ध पेठ बीड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून सदर तीन रेड मध्ये किमती ५६ हजार ६६० रु. चा मुद्देमाल ताब्यात घेत पाच जणांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर व सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली टाकलेल्या चार जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत ३ लाख १४ रु. चा मुद्देमाल ताब्यात घेत एकूण अकरा जणां विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!