• Fri. Apr 24th, 2026

सत्तेतील निजामी मराठ्यांचा ,गरिब मराठ्याच्या आरक्षणाला विरोध:बाळासाहेब आंबेडकर.

Bybaba maske

Oct 11, 2023

सत्तेतील निजामी मराठ्यांचा,गरिब मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध:बाळासाहेब आंबेडकर.

रोखठोक न्युज 

आज दिनांक 11 रोजी वंचित बहुजन आघाडीची प्रचंड मोठी सभा बीड शहरात झाली.बीड जिल्ह्य़ातील वंचित समाजाचे लोक स्वःखर्चाने आप आपले वाहनातून, बस ने जे मिळेल त्यांच्या ने शहरात दाखल झाले होते.3 ते 4 वाजता सुरू झालेली सभा संध्याकाळी 7 वाजता संपली.या सभेत बाळासाहेबांनी बोलताना असे म्हटले की जो पंर्यत काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या बरोबर युती करत नाही तो पर्यंत ते सत्तेत येऊ शकत नाहीत.तसेच मराठा आरक्षणा बदल बोलताना म्हणाले की ओबीसी च्या ताटातील आरक्षण मराठ्यांना देण्या पेक्षा त्यांना वेगळे ताट म्हणजे वेगळे आरक्षण द्या.जर सत्तेत बसलेल्या शिंदे,फडणवीस,पवार यांना देता येत नसेल तर सत्ता वंचित बहुजन आघाडी कडे द्या मी आरक्षण देतो.तसेच त्यांनी सत्तेत बसलेल्या श्रीमंत मराठ्यांना बोलताना सांगीतले की हे जे निजाम कालीन मराठे जे की निजाम गेल्या पासून सत्ता उपभोगत आहेत.आमदार,खासदार, कारखानदार,झालेत ते ह्या गरिब मराठ्यांना आरक्षण मिळू देत नाहीत कारण जर का यांना आरक्षण भेटले तर हे सुद्धा सत्तेत येतील व आपले वांदे होतील या कारणावरून निजाम कालीन मराठे गरिब मराठ्यांना आरक्षण भेटू देत नाहीत.सत्ता वंचित कडे द्या मी आरक्षण देतो.या वेळेस प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर,मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे.राज्य उपाध्यक्ष बीड जिल्हा प्रभारी किसन चव्हाण व मान्यवर उपस्थित होते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!