• Fri. Oct 30th, 2026

पंकज कुमावत यांच्या पथकाने 25 लाखाचा गुटखा पकडला

Bybaba maske

Oct 12, 2023

पंकज कुमावत यांच्या पथकाने 25 लाखाचा गुटखा पकडला.

रोखठोक न्युज वार्ताहर 

दि. 11 : सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने चौसाळा परिसरात अशोक लिलेंड वाहनात 25 लाखांचा गुटखा पकडला. ही कारवाई बुधवारी (दि.11) रात्री 9 च्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कलीम खलील शेख (रा. आझादनगर धारुर) लायक खलील शेख (रा.धारुर), जावेद उर्फ बब्बू शेख बशीर (रा. मोमीनपुरा, बीड), वाहन मालक शेख माजीद शेख मुक्तार (रा. बीड) अशी आरोपीचे नाव आहेत. सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना अशोक लिलेंड वाहनात गुटखा जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पथकाला पाठवून सापळा रचत चौसाळा परिसरात वाहन पकडले. यावेळी 25 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील उपनिरीक्षक अप्पासाहेब रोकडे, बाहळासाहेब डापकर, दिलीप गित्ते, अनिल मंदे, शेळके, महादेव बहिरवाळ यांनी केली.

baba maske

Related Post

केज पोलिसांची सतर्कता! हरवलेले ११ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत; नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
दिवाळीच्या तोंडावर अतिक्रमणधारकांवर प्रशासनाचा हातोडा! दुष्काळात छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ?अंबाजोगाईत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शासकीय रुग्णालयापर्यंत दोन्ही बाजूंनी ५०-५० फुटांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम; वर्षभरात दुसऱ्यांदा कारवाई, नागरिकांत संताप!
ट्रॅक्टर ट्रॉलीवर कार धडकली, अंबाजोगाईचे दोघे जखमी ट्रॅक्टर ट्रॉलीवर कार धडकली, अंबाजोगाईचे दोघे जखमी केज तालुक्यातील कुंबेफळ शिवारातील अपघात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!