• Wed. Jun 3rd, 2026

पुन्हा बीड जिल्ह्य़ात गांजा वर कारवाई,पंकज कुमावत यांनी धाड टाकून केला १ लाख ४४ हजार रु चा गांजा जप्त.

Bybaba maske

Oct 13, 2023

पुन्हा बीड जिल्ह्य़ात गांजा वर कारवाई

धारूर तालुक्यात पिंपरवडा येथे शेतात कापसाच्या पिकात गांजा लागवड

पंकज कुमावत यांनी धाड टाकून केला १ लाख ४४ हजार रु चा गांजा जप्त

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- पंकज कुमावत यांनी धारूर तालुक्यात कापसाच्या पिकात लावलेल्या गांज्याच्या झाडावर कारवाई करून १ लाख ४४ हजार रु. चा गांजा ताब्यात घेतला आहे.

दि.१२ आक्टोबर रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, मौजे पिंपरवाडा शिवारात लक्ष्मण जयवंत तिडके (रा. भोगलवाडी ता. धारूर) याने त्याच्या शेतात सर्व्हे/गट नंबर ३१५ मध्ये बेकायदेशीररित्या गांजाची झाडे लावून त्याचे संवर्धन करून जोपासना करीत आहे. अशी खात्रीपूर्वक माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे आणि पंकज कुमावत यांच्या पथकातील कर्मचारी बाळासाहेब डापकर, दिलीप गित्ते, अनिल मंदे, गोविंद मुंडे, वसंत भताने, कदम, गायसमुद्रे, शेख यांनी संयुक्तपणे छापा मारला. या वेळी कापसाच्या पिकात १६९ झाडे आढळून आली त्याचे वजन २८ किलो आणि त्याची किंमत १ लाख ४४ हजार ५२० रु चा गांजा जप्त करण्यात आला. आरोपी लक्ष्मण जयवंत तिडके याचे विरुद्ध एनडीपीएस कायद्या नुसार धारूर पोलीस ठाण्यात गु. र. नं. ३५५/२०२३ गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोविकारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १८८५ चे कलम २० नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!