• Sat. Apr 18th, 2026

पोलीस नाईक दिलीप गित्ते सहा सुवर्णपदके व कांस्यपदक पटकावून बीड पोलिसांची मान उंचावली

Bybaba maske

Oct 13, 2023

पोलीस नाईक दिलीप गित्ते सहा सुवर्णपदके व कांस्यपदक पटकावून बीड पोलिसांची मान उंचावली

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्याचे दिलीप गीते यांना जलतरण मध्ये सहा सुवर्ण पदक व एक कांस्यपदक पटकावून पोलीस नाईक दिलीप गित्ते यांनी विक्रम केला.

दि. ६ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा या धाराशिव जिल्हा येथे आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण, बीड, जालना व धाराशिव या पाच जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये जलतरण स्पर्धा धाराशिव जिल्ह्यातील विहार स्विमिंग पुलावर पार पडल्या. या स्पर्धेमध्ये ५० मीटर फ्रीस्टाइल, ५० मीटर बॅक स्टॉक, १०० मीटर फ्रीस्टाइल, ४०० मीटर फ्री स्टाईल, ८०० मीटर फ्री स्टाईल , १५०० मीटर फ्री स्टाईल या स्विमिंग प्रकारामध्ये केज पोलीस ठाण्याचे व सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या डी बी पथकातील पोलीस नाईक दिलीप गित्ते यांनी एकूण सहा सुवर्ण पदके मिळवले तसेच २०० मिटर फ्री स्टाईल मध्ये कांस्यपदक मिळवले. पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये दिलीप गित्ते यांनी सर्वाधिक पदके जिंकून बीड जिल्ह्याची आणि केज पोलीस ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयकजी मान उंचावली आहे.

धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब व बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागी पोलीस अधिकारी पंकज कुमावत, केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, गेम इनचार्ज बाबर, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कादरी, पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक लांडगे आणि सर्व पोलीस कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!