• Thu. Apr 30th, 2026

घरात घुसुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

Bybaba maske

Oct 25, 2023

घरात घुसुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

रोखठोक न्युज वार्ताहर 

 केज तालुक्यातील एका गावात एका घरात घुसुन अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने केज तालुक्यात एकच खळबळ उडाली असुन केज तालुक्यात पंधरा दिवसातील ही दुसरी घटना २१ ऑक्टोबर रोजी घडली आहे. या गुन्ह्यतील आरोपीला पिंक पथकाचे फौजदार प्रकाश शेळके यांनी अटक केले आहे.

सरकारने महीला अत्याचार कमी होण्यासाठी अनेक प्रतिबंदक कायदे करुन देखील या अन्याय अत्याचाला आळा बसत नसल्याचे पहावयास मिळत आहे. केज तालुक्यातील एका गावात घरात कुणी नसल्याचे पाहुन १९ वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी घडली असुन केज पोलीस ठाण्यात गुन्हा गुरनं ६३८ / २०२३ कलम ३७६, ४५२, ३२३, ५०४, ५०६ भादवि सह कलम ४/२, ६ बलकांचे लैगिंक अपराधांपासुन संरक्षण अधिनीयम २०१२ प्रमाणे गुन्हा नोंद झाला असुन पुढील तपास पिंक पथकचे कर्तव्यदक्ष फौजदार प्रकाश शेळके हे करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!