केज शहरातील रस्ते नाल्यांची रुंदी कमी करून उतरलेला निधी कोणाच्या घशात घालणार?
का आपल्या खाजगी प्लांटीग मध्ये निधी वापरणार?
रोखठोक न्युज
केज शहरात नगरपंचायत अंतर्गत नगरोत्थान योजने खाली 76 कोटी रूपायाचा निधी तुन विविध भागातील रस्ते, नालीचे काम होत आहेत.निधी आल्यापासून याना त्या मार्गाने त्याचा गाजावाजा होत आहे.काम कोणत्या कंपनी ने करण्यापासून ते सत्ताधाऱ्यांच्या कमिशन पंर्यत चर्चेचा उत केज शहरात आहे.कसे बसे काम चालु झाले तर वार्ड क्रमांक आठ(8) मध्ये त्या कामा विषयी विविध तक्रारारी येत आहेत.मंगळवार पेठ काॅर्नर ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौका पासुन छत्रपती शिवाजीमहाराज चौका पंर्यत पुर्ण रस्ता हा 33 फुटाचा करायचा असताना त्या भागातील रहिवाशांकडून रस्त्यावर झालेले आतिक्रमन नगरपंचायत च्या सौजन्याने तसेच ठेवून नाली व रस्ता तयार केला जात आहे.रस्त्यावरचे झालेले आतिक्रम हे नगरपंचायत ने काढून देऊन रस्ता मोकळा करून देणे महत्त्वचे आहे.कमित कमी आपल्या नगरपंचायत मधील डिपी प्लॅन तरी बघून काम करा,असे असताना हा रस्ता 33 फुटाचा न हो ता खुप लहान होत आहे.कुठे 20,तर कुठे 15 तर जुनी जिल्हा परिषद ची शाळा रोज्जा मोहल्ला येथे फक्त 5 फुटाचा रस्ता केला जात आहे.अशीच परिस्थीती प्रत्येक नगरोत्थान च्या कामा मध्ये केज शहरात दिसून येत आहे.असे लहान रोड कमी बजेट मध्ये करून बाकी राहिलेला निधी एकतर स्वाःह करायचा किंवा सत्ताधाऱ्यांची जिथे प्लांटीग आहे तिथे रस्ता बनवायचा किंवा तोच निधी केज च्या बाहेर जिथे अजून वस्ती नाही पण प्लाॅटीग आहे तिथे घेऊन जाण्याचा पुर्ण नियोजन ठरले आहे.केज शहरातील सगळ्यात जुने व मोठे रस्ते अरुंद करण्याचा हा एक डाव आहे.पण ज्या शहराने आपल्याला सत्ता दिली, ज्यांच्या तोंडात सदानकदा खाजाची पांढर आहे.म्हणून उदो उदो केला जातो तिथेच भ्रष्टाचार करताना हाथ थर थरत नाहीत का असा प्रश्न आता शहरात विचारला जात आहे.नगरपंचायत ने अतिक्रमण काढून व्यवस्थित नाली बांधून रस्ते रुंद व मोठे 33 फुटाचे करावेत अशी मागणी होत आहे.