• Fri. Apr 24th, 2026

इतना सन्नाटा क्युं है भाई!!केज मध्ये जनतेला पडलेला प्रश्न

Bybaba maske

Nov 4, 2023

इतना सन्नाटा क्युं है भाई!!केज मध्ये जनतेला पडलेला प्रश्न 

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज नगरपंचायती निवडणूक होऊन आडीच वर्ष होत आले.जनतेने कुठल्याच पक्षाला बहुमत दिले नसल्या मुळे युतीत जनविकास व काँग्रेस यांनी हातमिळवणी केली व सत्तेत आले.जनविकास आघाडीचे सर्वेसर्वा यांनी निवडणूकीत मोठ मोठ्या गपाट्या मारून सत्ता तर मिळवली पण आता आश्वासन पूर्ण करता करता नाकीनऊ आलेली दिसतेय.केज शहरता नगरोत्थान योजनेतून आमदार नमिताताई मुंदडा यांनी आणलेला 76 कोटी च्या निधीतून होणाऱ्या कामा व्यतिरिक्त कुठलेच काम शहरात दिसून येत नाही.केज शहराची तहान भागवनारे धनेगाव येथील मांजरा धरण पाऊस कमी झाल्या मुळे भरले नाही अजून ही मृत साठ्यात असताना केज नगरपंचायत शहरातील नागरिकांचे पाण्या साठी वेगळा उपाय शोधताना दिसत नाही अजून ही हातावर हात ठेवून टंचाई कधी निर्माण होते याची वाट पहात असल्याचे चित्र दिसून येत आहे.भर पावसात असो नाहीतर कुठलाही ऋतु असो केजच्या नागरिकाच्या नशीबात आठवड्यात एकदाच पाणी नळातून मिळते.या उन्हाळ्यात काय होते ते आता नगरपंचायत च्या हातात आहे.सद्या तरी बोअरवेल ला पाणी आहे म्हणून पाणी प्रश्न तेवढा तिव्र नाही.पण भविष्यात होऊ शकतो.नगरपंचायत चे शहरातील आर्ध्याच्या वरील बोअरवेल बंद आहेत. नगरपंचायत मधील लोकांचा आलेला कर कोणाच्या खिशात जात आहे हे जनतेतून आता विचारले जात आहे.दिवस भरात किती रक्कम टॅक्स द्वारे जमा होते हे पहाण्या साठी दोन नगरसेवक तिथे नेमले असल्याचे नागरिकात चर्चा आहे. कारण जेवढा कर भरतो तेवढ्या सुविद्या नगरपंचायत देत नाही मग टॅक्स चा पैसा कुठे जातो हा गंभीर प्रश्न आहे.नगरपंचायत मध्ये विरोधी पक्ष आहे का नाही हा तर संशोधन करण्याचा विषय झाला आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजीमहाराज चौका पंर्यत 33 फुटाचा रोड असताना जनविकास चे सर्वेसर्वा यांच्या भाऊबंदकीचै आतिक्रमन वाचवता वाचवता रोड फक्त कुठे पाच तर कुठे दहा फुटाचा झाला आहे.सद्या तरी आमदार नमिताताई यांनी प्रयत्न करून आणलेल्या निधीवरच स्वतःची छाती बडवायच काम नगरपंचायत मार्फत चालू आहे.डेंगू चे रूग्ण आढळून येत असताना.एका डॉक्टर मुलीचा जिव जाऊन ही नगरपंचायत ने कोठे फवारणी केल्याचे दिसुन येत नाही.नगरपंचायतने केज शहरातील छोट्या टपरीधारकाचे ठराव घेऊन त्यांचे अतिक्रमण काढून रस्त्यावर आणले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!