• Fri. Apr 24th, 2026

दुष्काळ ग्रस्त यादीतून केज तालुका वगळला.कृषी मंत्री असलेले पालकमंत्री चिडीचूप. तहसीलदारांनी आकडेवारी लपवली का?

Bybaba maske

Nov 5, 2023

दुष्काळ ग्रस्त यादीतून केज तालुका वगळला.

कृषी मंत्री असलेले पालकमंत्री चिडीचूप.

तहसीलदारांनी आकडेवारी लपवली का?

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुका तसा पहिल्या पासूनच दुष्काळीच आर्धा तालुका मांजरा धरणा मुळे ग्रीन बेल्ट म्हणून ओळखतात तर आर्धा भाग हा दुष्काळी.पण या वर्षी पाऊस तसा झालाच नाही तालुक्यातील कुठलेच नदी,नाले ओसंडून वहीले नाहीत,तलावात गेल्यावर्षी पडलेल्या पाऊसाच पाणी ते पण मृत साठ्यात.बोअरवेल,विहीरीची ही तीच अवस्था तरीही केज तालुका दुष्काळग्रस्त यादीतून कसा वगळला याचे अश्चर्य तालुक्यातील जनतेत दिसून येत आहे.नेमके बीड जिल्हा व तालुका प्रशासनाने पाऊसाची आकडेवाडी लपवली का? का शासन दरबारी सत्ताधारी कमी पडले याचे आकलन होत नसल्याच दिसून येत आहे.प्रत्येक आठवड्यात एक शेतकरी आत्महत्या करतोय कधी ना पिका मुळे तर कधी कर्जबाजारी मुळे.याची सविस्तर माहिती केज तहसीलदाराला माहित असताना त्यानी ती लपवली का असा प्रश्न निर्माण होत आहे.तरी सत्ताधारी व विरोधीपक्षाती पुढाऱ्यांनी याच्यावर आवाज उठवावा.बीड जिल्हाचे पालकमंत्री जे की कृषी मंत्री असताना जर असे होत असेल तर ते दुर्दैवी आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!