• Fri. Apr 24th, 2026

केज मध्ये गरिबांची दिवाळी कडूच… ना आनंदाचा शिधा वाटप, ना गहू तांदुळ वाटप. केज तहसीलचा पुरवठा विभाग झोपेत.

Bybaba maske

Nov 8, 2023

केज मध्ये गरिबांची  दिवाळी कडूच… ना आनंदाचा शिधा वाटप, ना गहू तांदुळ वाटप.

केज तहसीलचा पुरवठा विभाग झोपेत.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्याचे तहसीलदार करतात काय?असा प्रश्न आता गोरगरीब,कष्टकरी जनतेला पडलेला आहे.कारण दिवाळीचा सण एक दिवसा वर आला असताना ही कुठल्याच राशन दुकानात त्याचे वाटप झाल्याचे दिसून येत नाही तसेच गोरगरीब जनतेला गहू,तांदूळ,दाळ वाटप केले जाते. गहू,तांदूळ,दाळ गोडाऊन आले आहे पण राशन दुकानात वाटप झाले नाही त्या मुळे गरीब जनतेची दिवाळी कशी होणार हा प्रश्न चिन्ह आहे.केज शहरातील राशन दुकाना साठी तर नवीन नियमावली आली आहे.शहरातील राशन चा माल हा गोडाऊनला न येता गुत्तेदार त्या दुकानात माल डायरेक्ट नेऊन देणार.गुत्तेदार जर माल सरळ दुकानदाराला देत असेल तर यात दुकानदार व गुत्तेदार मिळून घोटाळा करू शकतात यांच्यावर तहसील च्या पुरवठा विभागाचा अंकुश कसा राहील आणि जर घोटाळा झाला तर गोरगरीब लोकांची दिवाळी कडूच.त्यामुळे राशन दुकानात माल वाटप होताना केज तहसीलच्या पंचा देखत माल ऊतरवून वाटप करावा असे नागरिकात चर्चा आहे.  श्रीमंत लोकांची दिवाळी साजरा होत असताना गरीबांना मात्र राशन च्या गहू तांदूळ,आनंदाचा शिधावाटपाची वाट बघावी लागणे दुर्दैवी आहे.आज केज शहरात रोखठोक टिम फिरली असता सर्व स्वस्त धान्य दुकान बंद असल्याचे दिसून आले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!