बसस्थानकात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरानी धुमाकूळ घातलं असुन बस मध्ये महीला चडत असताना गळ्यातील दागीने व पर्स चोरीचे प्रमाण वाढले असुन याकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असून या चोराचं बंदोबस्त कराव अशी मागणी होत आहे. केज बसस्थानकात पोलीस चौकी उभारण्यात आली असून ही तिथे एक ही पोलीस कर्मचारी उपस्थित नसतो. दिपावली सारखा मोठा सण आहे.त्यामुळे प्रवासी खूप वाढले आहेत व गर्दी ही वाढली आहे याचा फायदा चोरटे उचलत आहेत कमीत कमी या सणासुदीच्या काळात तरी पोलीस कर्मचारी बसस्थानकात द्यावा ही विनंती प्रवासी करत आहेत. आज दुपारी दिडच्या दम्यान मेहकर पंढरपूर बस केज बस्थनकात आली असता उस्मानाबाद कडे जाण्यासाठी दोन मुली बस मध्ये चडल्या असताना अज्ञात चोरट्यानी एका मुलीचे पर्स चोरली हि बाब मुलीच्या लक्षात येताच त्यानी चालु बस मध्ये रडायला सुरवात केली हे पाहुन चालकाने गाडी पोलीस ठाण्यात घेवून आले असता पोलीसांनी बस मध्ये आलेल्या सर्वच प्रवाशांची तपासनी केली मात्र त्या चोरीला गेलेला पर्स अढळून आली नाही अखेर त्या मुलीला काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत करुण पाठवून दिले. चोरीला गेलेल्या पर्सचा तपास केज पोलीस करत आहेत.